मागी गणेश जयंतीच्या निमित्त पिंपरी चिंचवड भोसरी येथे प्रथमच श्री स्वामी समर्थ संस्कार वर्गाचे स्नेहसंमेलन…

उपसंपादक-रणजित मस्के
पिंपरी चिंचवड:– लहान मुलांचे वाढते गुन्हेगारीचे प्रमाण बघता मुलांवर लहान वयातच योग्य चांगले संस्कार व्हायला पाहिजे. पण आई-वडिलांना वेळ नसतो. दोघेही कामावर जातात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात आजी आजोबा नसतात .मुले घरात एकटेच असतात त्यामुळे चांगले वाईट कळत नाही. चारित्र्यसंपन्न, सुसंस्कार ,सुदृढ राष्ट्र बनवण्यासाठी या लहान वयातच मुलांना संस्काराची गरज असते.

हेच काम पिंपरी चिंचवड भोसरी मधील श्री स्वामी समर्थ संस्कार वर्गाच्या माध्यमातून सौ उषा घुगे व श्री शिवाजी घुगे दांपत्य करत आहेत. लहान लहान मुलांनी गणपतीचे श्लोक स्तोत्र तसेच गणपती अथर्वशीर्ष म्हणून लाडक्या गणपती बाप्पाला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्री स्वामी समर्थ संस्कार वर्गाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत नृत्य करून अतिथींचे स्वागत केले. गणेश पूजन व दीप प्रज्वलन राजमाता महिला संघाच्या अध्यक्ष सौ वैशालीताई गव्हाणे यांनी केले.

गायत्री सखी मंचच्या अध्यक्ष सौ कविता भोंगाळे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. अंकुर इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्ष सौ मुटकुले मॅडम पण उपस्थित होत्या श्री स्वामी समर्थ संस्कार वर्गाच्या अध्यक्षा उषा घुगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर सचिव श्री शिवाजी घुगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

यावेळी संस्कृती व स्वराज गुंजाळ यांनी मुलांना लाठी काठी व दांडपट्ट्याचे प्रात्यक्षिक दाखवले श्री स्वामी समर्थ संस्कार वर्गाच्या मुलांनी गाणे व नृत्यद्वारे ट्रॅफिक रूल्स पाळणे, स्वच्छता राखणे, मोठ्यांचा आदर करणे, स्वतः सोबत इतरांचे संरक्षण कसे करावे हे सांगितले. यावेळी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष उमेद सुथार, पुणे जिल्हा अध्यक्ष एजाज शेख उपाध्यक्ष सिकंदर पटेल तसेच पुणे जिल्हा महिला अध्यक्ष अमरीन पटेल पिंपरी चिंचवडच्या शहराच्या अध्यक्ष विना पिछाडी या उपाध्यक्ष सुनीता अग्रवाल ,शेखर पवार सुनिता अल्हाट, निलम दारवटकर ,पुनम गर्ग, सौदामिनी चव्हाण, सुनिता पिटाळे, वंदना बलदोटा ,दिशा डोंगरे,राणी मैडम उपस्थित होते तसेच शिवगणेश प्रतिष्ठानचे सर्व कार्यकारी कार्यकर्ते उपस्थित होते. उषा घुगे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com