पोलीस अधिक्षक कार्यालय, गोंदिया येथे स्व. राजीव गांधी, यांचे जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार व सदभावना दिवसाची प्रतिज्ञा कार्यक्रमाचे आयोजन…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायन्वये तसेच पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्रान्वये रविवार दिनांक 20 ऑगस्ट 2023 एवजी शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी सदभावना दिवसाची प्रतिज्ञा घ्यावी. व स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे असे या कार्यालयास निर्देशित केल्याने त्याअनुषंगाने मा. श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया (कॅम्प देवरी) यांच्या हस्ते आज दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय, गोंदिया येथे स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तद्नंतर अपर पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्यासह उपस्थित पोलीस अधिकारी / अंमलदार व मंत्रालयीन स्टाफ यांनी सदभावना दिवसाची प्रतिज्ञेचे वाचन करुन प्रतिज्ञा घेण्यात आली.
पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथे आयोजित सदर कार्यक्रमात मा. अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री.अशोक बनकर, यांच्या सह पोलीस निरीक्षक, श्रीमती नंदिनी चानपुरकर, दिनेश लबडे, प्रतापराव भोसले, योगिता चाफले तसेच गोंदिया जिल्हयातील पोलीस अधिकारी/ अंमलदार व मंत्रालयीन स्टाफ हे मोठया संख्येने उपस्थित होते.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com