आषाढी एकादशीनिमित्त मुंबई सुवर्णकार संघाच्या वतीने तुळशी वाटप कार्यक्रम संपन्न..

0
Spread the love

प्रतिनिधी- महेश वैद्य

मुंबई :-मुंबई सुवर्णकार संघाच्या गिरगाव विभागाकडून बुधवार दिनांक 17 जुलै 2024 आषाढी एकादशीनिमित्त पंढरीनाथ देवालय मुगभाट येथे विठ्ठल भक्तांना तुळशी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.

मुंबई सुवर्णकार संघ गिरगाव विभागाचे अध्यक्ष मोहन शेठ म्हाप्रळकर सरचिटणीस सागर साने तसेच त्यांचे सहकारी संजय म्हशेळकर ,संतोष मुरकुटे, विकास मिरकर, यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रसादजी लोढा साहेब मुंबई काँग्रेस लीगल सेलचे अध्यक्ष एडवोकेट रवी जाधव स्थानिक नगरसेविका डॉ. अनुराधाताई पोतदार मुंबई सुवर्णकार संघाचे प्रमुख सल्लागार संजय वेदक सरचिटणीस अधिक वेर्णेकर खजिनदार संजय पितळे संयुक्तचिटणीस रवींद्र देवरुखकर उपखजिनदार सत्यविजय मोणकर सरचिटणीस सतीश वैद्य कार्यकारणी सदस्य अमोल नारकर , वसंत नारकर हे उपस्थित होते पंढरीनाथ देवालय समितीचे पदाधिकारी देवेंद्र खेडेकर ,नरेश वैद्य, जयवंत वैद्य, या सर्वांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पडला शेकडो विठ्ठल भक्ताने तुळशी घेतल्या मुंबई सुवर्णकार संघाकडून गिरगाव विभागाचे अभिनंदन करण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट