आषाढी एकादशीचे निमित्त महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फेआदिवासी मुलांना वह्या वाटप कार्यक्रम संपन्न..

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर :-पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर साहेब यांच्यासह पालघर देवखोप गावात आदिवासी मुलांना वह्या वाटप व जनजागृती चा कार्यक्रम करण्यात आला.

पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या जनजागृती मार्गदर्शनाने.
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महा.राज्य. संस्थापक अध्यक्ष. राहुल दुबाले साहेब तसेच मुंबई / पालघर जिल्हा अध्यक्ष.मनीष जयस्वाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली.
दि.17/07/2024 रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून मंगेश उईके पालघर जिल्हा महासचिव व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा टीमच्या वतीने आदरणीय पालघर उप विभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर साहेब यांच्या हस्ते दस्तुरी पाडा देवखोप डॅम जवळ च्या गावात आदिवासी मुलांना वह्या वाटप कार्यक्रमकेला व त्या निमित्ताने त्यानी शिक्षणा बद्दल मार्गदर्शन जनजागृती करत.शिक्षण हे सकारात्मक विचार असून लोकांचा विचारात बदल घडवून आणते आणि नकारात्मक विचार दूर करते. आपल्या शिक्षणाकडे आपले पालक खूप महत्त्वाची भूमिका बजावतात शिक्षण देण्यासाठी सर्वोच्चपरी प्रयत्न करतात शिक्षण हे गावाच्या व देशाच्या विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. म्हणूनच प्रत्येक मुलांनी शिक्षण हे घेतलेच पाहिजे व सिगारेट, दारू व अन्य मादक पदार्थचे सेवनाच्या आधारे जाऊ नये. असे पालघर चे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांनी मुलांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या प्रकारे या कार्यक्रमात मुलांमध्ये जनजागृती करण्यात आली.या वेळेस पालघर देवखोप गावाचे माजी सरपंच तसेच ग्रामस्थ व महिला मंडळी .विद्यार्थी मुलं,मुली उपस्थित होते.

सोबतसंजय राऊत साहेब अल्लागार
संदेश मोरे साहेब तालुकाध्यक्ष
किरण पाटील साहेब तालुका सचिव
स्वामी निषाद साहेब कार्याध्यक्ष
अमोल गायकवाड साहेब संघटक
भूपेंद्र ठाकरे साहेब सदस्य
दीपक मोरी साहेब सदस्य
ऋषिकेश जाधव साहेब पत्रकार,सदस्य
सर्वांचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले .

तसेच पालघर जिल्हा महासचिव.तथा क्राईम इन्वेस्टीगेशन ब्युरो.पालघर जिल्हाध्यक्ष आणि सुरक्षा पोलिस टाईम्स. प्रतिनिधी. मंगेश उईके यांचे ग्रामस्थांनी व माजी सरपंच पांडुरंग दळवी यांनी पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर साहेब यांचे व पोलीस बाईज संघटनाचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रम संपन्न केला..

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट