मुंबई सुवर्णकार संघ यांच्या तर्फे ना.जगन्नाथ शंकरशेट यांच्या २२१ व्या जयंतीनिमित्त MSME GOLD VALUATION सर्टिफिकेट कोर्सचे आयोजन संपन्न…

प्रतिनिधी-महेश वैद्य
मुंबई:– मुंबई सुवर्णकार संघाच्या वतीने भारतीय रेल्वेचे जनक मुंबई नगरीचे आद्य शिल्पकार नामदार नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेट यांच्या 221 व्या जयंती निमित्त MSME गोल्ड valuation सर्टिफिकेट कोर्स चे आयोजन शुक्रवार दिनांक 09 फेब्रुवारी 2024 व शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी ठीक 10 ते सायंकाळी 5 पर्यंत या वेळेत IDEMI इन्स्टिट्यूट फॉर डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरींग इंस्टूमेंटस् ( MSME Technology सेंटर ) ईस्टर्न एक्सप्रेस हायवे समोर, एव्हराड नगर बस स्टॉप जवळ,स्वातंत्र्यवीर तात्या टोपे मार्ग,चुनाभट्टी सायन (पू)मुंबई नंबर ४०००२२ येथे करण्यात आला होता.
महाराष्टातील पुणे,सातारा,जळगाव,दोडा मार्ग,अहमदनगर,बोर्डी,पालघर,या भागातून 33 प्रशिक्षणार्थी नी गोल्ड Valuation चे ज्ञान घेऊन देशातील गोल्ड valuavr च्या यादीमध्ये आपल्या नावाची नोंद केली.


मुंबई सुवर्णकार संघाच्या वतीने शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी नाना शंकरशेट यांची 221 वी जयंती कोर्स मधील सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थी व इन्स्टिट्यूट चे अधिकारी यांच्या उपस्थितीत नानांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
मुंबई सुवर्णकार संघाचे सरचिटणीस श्री.अदिप वेर्णेकर यांनी नानांच्या कार्याचा परिचय करून देताना नानांचे कार्य सर्व समाजासाठी होते.दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून केलेले होते.नानांची जयंती देशातील प्रत्येक वर्गात साजरी केली गेली पाहिजे.नाना हे सुवर्णकार कुटुंबात जन्मले याचा संपूर्ण देशातील सुवर्णकार कुटुंबीयांना गर्व असायला हवा.नानांचे मुंबई येथील मुंबई सेंट्रल टर्मिनल ला देण्यात येणारे प्रलंबित असलेले नामकरण लवकरच प्रत्यक्ष कृतीत येवो अशी प्रतिक्रिया व्यक्त करून देशातील लाखो सुवर्णकार बांधवांनी या पाठ पुराव्यास पाठिंबा द्यावा.अशी इच्छा व्यक्त केली. व सर्व उपस्थितांना मुंबई सुवर्णकार संघाच्या वतीने नानांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.



मुंबई सुवर्णकार संघाच्या वतीने संयुक्त चिटणीस श्री.रविंद्र देवरुखकर,कार्यकारणी सदस्य श्री.रमेश परवता ,कु.सोनल जाधव हे उपस्थित होते.गोल्ड valuation मार्गदर्शक श्री.प्रच्युत सिंघल यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com