गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उमदी पोलीस ठाणे हद्दीतील रमेश खरात टोळी हद्दपार…

उपसंपादक – रणजित मस्के
सांगली :-
उमदी पोलीस ठाणे हदीतील गुन्हेगार रमेश यशवंत खरात टोळीस मा. डॉ. बसवराज तेली. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सांगली व सोलापूर या दोन जिल्हयातुन २ वर्षे कालावधीकरिता हद्दपार आदेश पारीत केला आहे. आगामी गणेशोत्सव तसेच इतर सण व उत्सव शांततेत पार पडावेत, कोणताही अनुचित प्रकार घडु नये, गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडुन काढुन त्यांचे समुळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभुमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.
उमदी पोलीस ठाणेच्या हदीमध्ये यातील हदपारी टोळी प्रमुख १) रमेश यशवंत खरात, वय २४ वर्षे, रा. तिकोंडी, ता. जत, जि. सांगली व टोळी सदस्य २) तानाजी आमसिद्धा करे, वय २६ वर्षे, रा. तिकडी, ता. जत, ३) महादेव ऊर्फ पप्पू म्हाळाप्पा करे, वय २० वर्षे, रा. मिबर्गी, ता. जत ४) संभाजी विराप्पा शेंडगे, वय २२ वर्षे, रा. तिकडी, ता. जत जि.सांगली या टोळीविरुद्ध सन २०१९ ते २०२३ या कालावधीत गैरकायद्याची मंडळी जमवुन घातक हत्याराने गंभीर दुखापत करणे, घरात घुसून गर्दी मारामारी करुन मालमत्तेचे नुकसान करणे, बंदी आदेशाचे उल्लंघन करून दुखापत करणे, बेकायदा बिगरपरवाना गौणखनिज चोरी करणे, महामारीच्या काळात गैरकायद्याची मंडळी जमवून जिवीतास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली कृती करुन लोकसेवक सार्वजनिक कर्तव्य पार पाडीत असताना त्यास अटकाव करून त्याचेवर बळाचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी बंदी आदेशाचा भंग करुन मारामारी करणे असे गंभीर स्वरुपाचे शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे एकुण १९ गुन्हे दाखल आहेत. नमुद सामनेवाले हे कायदा न जुमानणारे आहेत. त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पंकज पवार, सहा. पोलीस निरीक्षक, उमदी पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रस्तावाचे पोलीस अधीक्षक, सांगली यांनी अवलोकन करुन, सुनिल साळुंखे चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, जत विभाग, जत यांचेकडे चौकशी कामी पाठविला. त्यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा व सद्यस्थितीचा अहवाल तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन, मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन, नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करुन टोळी प्रमुख १) रमेश यशवंत खरात, वय २४ वर्षे, रा. तिकडी, ता. जत, जि. सांगली व टोळी सदस्य २) तानाजी आमसिद्धा करे, वय २६ वर्षे, रा. तिकोंडी, ता. जत, ३) महादेव ऊर्फ पप्पू म्हाळाप्पा करे, वय २० वर्षे, रा. भिवर्गी, ता. जत ४) संभाजी विराप्पा शेंडगे, वय- २२ वर्षे, रा. तिकडी, ता. जत जि.सांगली यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदीनुसार सांगली व सोलापूर या दोन जिल्हयातुन २ वर्षे कालावधीकरिता तडीपारी आदेश पारीत केला आहे. टोळीने गुन्हे करणा-या टोळ्यांवर यापुढे बारकाईने नजर ठेवून ती नेस्तनाबुत करण्यासाठी कड़क कायदेशीर कारवाई यापुढेही करण्यात येणार आहे.




सदर कारवाईमध्ये मा. पोलीस अधीक्षक, डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सतीश शिंदे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, सिध्दाप्पा रुपनर, पोकों/दिपक गट्टे स्था. गु. अ. शाखा सांगली, तसेच सहा. पोलीस निरीक्षक, संदीप शिंदे, मपोकों / छाया बाबर उमदी पोलीस ठाणे, यांनी भाग घेतला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com