लोणंद शहरातील मार्केटयार्ड परिसरामध्ये गांजा विक्री करण्याकरीता आलेल्या पोलीस अभिलेखावरील आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडून ३,६७,१००/- रुपये किंमतीचा १४.६८४ किलो ग्रॅम गांजा आणि १४.००,०००/- रुपये किमतीची स्विफ्ट व सिफ्ट डिझायर जशी दोन वाहने जप्त…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अंमली पदार्थ गांजा याची विक्री, लागवड, वाहतूक करणारे इसमाचे विरुध्द कारवाया करण्याच्या सुचना
पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून
त्यांना सातारा जिल्हयातील अंमली पदार्थ गांजाची विक्री, वाहतूक, लागवड करणाऱ्या इसमांची माहिती
प्राप्त करून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

दि.२६/०८/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी उपलब्ध मंगलेश भोसले रा. सोनगाव ता. बारामती जि.सोलापूर हा स्विफ्ट डिझायर क्रमांक एम.एच.१९ बी. एच. १०५५ मधून अंमली पदार्थ गांजाची विक्री करण्याकरीता येणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र मोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांना पथकासह नमुद इसमास ताब्यात घेवून त्याचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले. नमुद पथकाने प्राप्त माहितीचे ठिकाणी सापळा लावून पोलीस अभिलेखावरील आरोपी व त्याचा साथिदार वास वाच्यात घेतले. नमुद दोन्ही इसमाच्या यातून एकूण २.६७,१००/- रुपये किमतीचा १४ किलो ८४ गांजा य १४,००,०००/- रुपये किमतीची स्विफ्ट व स्विफ्ट डिझायर अशी दोन वाहने हस्तगत करून त्यांचेविरुध्द लोणंद पोलीस ठाणे गु.र.नं. ४०० / २०१३ गुगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २०) (ii) (ब) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

पोलीस अभिलेखावरील आरोपी उपलब्ध मंगलेश भोसले यांचेवर दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती

गु.र.नं.व. कलम ४०२/२०२२ भाविक १४३, १४७, १४८ वगैरे

६१/२०१३ भादविक ३१७

२२५/२००१] भाविक ३१५

३९०/२००९ भाविक ४५७, ३८०

१०२/२०१० भाविक ३५६

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, पोलीस अमलदार तानाजी माने, सुधीर बनकर, अतिश पाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद चेपले प्रविष्ण फडतरे, साबीर मुल्ला, हसन तडवी, मुनीर मुल्ला, प्रविण काच, मनोज जाधव, शिवाजी भिसे, केतन शिंदे, मोहसिन मोमीन, धीरज महाडीक, शिवाजी गुरप, अमृत कर्पे यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यानी अभिनंदन केले आहे.

आरोपींची नावे :
1) उपलब्ध मंगलेश भोसले वय 35 वर्षे रहाणार सोनगाव, ता.बारामती ,जि. सोलापूर
2) चेतन वामन जाधव वय 33 वर्षे राहणार जेजुरी ,ता. पुरंदर, जि.पुणे ( माल विकत घेणारा )

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट