पालघर जिल्ह्यातील विविध आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा रिपाईच्या वतीने तातडीने विद्यार्थ्यांची भेट घेऊन विचारपूस व शासन दरबारी चौकशीची मागणी..

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:- पालघर जिल्ह्यातील पालघर,डहाणू, तलासरी, आणि वसई येथील वस्तीगृह( आश्रम शाळा ) आंबेसरी, खंबाळे,तवा,नानिवली, महालक्ष्मी, नंडोरे, रणकोळ, टाकवाल,लालठाणे यांच्यासह दहा ते बारा आश्रम शाळेतील जवळजवळ ४३१ विद्यार्थ्यांना सोमवारी रात्री देण्यात आलेल्या अन्नातून विषबाधा झाल्याने उलट्या मळमळ जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना मनोर,सफाळे,पालघर,डहाणू,कासासह विविध रुग्णालयात दाखल केले. या शाळांना मध्यवर्ती स्वयंपाक गृह कांबळगाव बेटेगाव बोईसर येथील कम्युनिटी किचन मधून आहार पुरवण्यात आला होता.



विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समजतात रिपाई(आ )पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आयु.सुरेश जाधव, वर्षा काटेला (महिला आघाडी अध्यक्षा अनु. जमाती सेल पा. जि.)शरद जाधव (युवा अध्यक्ष पा. ता.)राम ठाकूर (युवा उपाध्यक्ष पा. ता.)सचिन घाडीगावकर(युवा संघटक पा. ता.)व पदाधिकारी यांनी तात्काळ पालघर ग्रामीण रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. तसेच मुलांना चांगले उपचार मिळावे यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना मिळत असलेल्या उपचाराच्या आढावा घेतला.

सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन मध्यवर्ती स्वयंपाक गृहातील कर्मचारी, अधीक्षक, ठेकेदार जेवणाची गुणवत्ता टेस्ट करणारे अधिकारी यांची सखोल चौकशी व्हावी. सदर प्रकरण हे मुलांच्या जीवाशी बेतनारे होते. कारण यापुढे अशा घटना पालघर जिल्ह्यात घडल्या आहेत त्यामुळे संबंधित प्रकरणाची योग्य ती दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीचे पत्र रिपाई (आ )पालघर जिल्ह्याच्या वतीने देण्यात आले.यावेळी आयु सुरेश जाधव (पालघर जिल्हाध्यक्ष ) राजकुमार यादव( पा.जि.संघटक ) वर्षा काटेला (महिला अध्यक्षा अनु.जमाती सेल पा.जि )शरद जाधव (युवा अध्यक्ष पा.ता.) राम ठाकूर (युवा उपाध्यक्ष पा.ता.) सचिन घाडीगावकर (युवा संघटक पा.ता.)राजू शेख (युवा सहसंघटक पा.ता.) संजोग उपाध्याय (महिला आघाडी संघटक पा.जि.)प्रियंका दुबळा, शैला रोकडे, रेखा पुजारी, रेखा सुतार, सृष्टी काटेला, राजेश उपाध्याय व अनेक रिपाई चे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट