पालघर पोलीस विभाग व नशाबंदी मंडळ यांच्या वतीने अमली पदार्थविरुद्धात ” व्यसन सोडा माणसं जोडा “पालघर आनंद आश्रम हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना दिले मार्गदर्शन..

प्रतिनिधी. मंगेश उईके
पालघर:- २६ जून रोजी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय पालघर जिल्हा, जिल्ह्य परिषद पालघर, पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, जिल्हा समाजकल्याण विभाग, शिक्षण विभाग, पोलिस विभाग पालघर, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्हा चे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद आश्रम हायस्कूल पालघर येथे आयोजन करण्यात आले होते. वावेळी प्रमुख पाहुणे शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संगीता भागवत मॅडम, उपशिक्षणाधिकारी माधव मते, जिल्हा मानसोपचार तज्ञ डॉ. अमोल भुसारे, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा समन्वयक मिलिंद पाटील, स्थानिक गुन्हे शाखा
पालघर चे पोलिस निरीक्षक अनिल विभूते, आनंद आश्रम हायस्कूल चे मुख्याध्यापक फादर व्यासपीठावर उपस्थित होते, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांनी Say No To Drugs Yes To Life , अंमली पदार्थ्यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करत व्यसन सोडा माणसे जोडा तसेच आमी कोणतेही व्यसन करीत ना आहोत… तुम्ही ही करु नका असे आवाहन उपस्थितांना केले. जिल्हा परिषद पालघर शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संगीता भागवत मॅडम यांनी सांगितले की युवकांना अंमली पदार्थ विरोधी मानसिकता निर्माण करणे युवकांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्यासह शिक्षणावरही होत आहे. पालघर
जिल्हा मानसोपचार तज्ञ डॉ अमोल भुसारे यांनी मार्गदर्शनात
व्यसंना मुळे माणसास



शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोड द्यावे लागते व्यसनाच्या चक्र व्यूहातून तरुण पिढीला बाहेर काढून त्याना निर्व्यसनी बनवने हा उद्देश आहे. यावेळीची थीम स्पष्ट आहेः प्रतिबंधात गुंतवणूक कराहद्द अशी आहे. यावेळी स्थानिक गुन्हे शाखा पालघर चे पोलिस उपनिरीक्षक गणपत सुळे, पालघर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत पराड, गोपनीय विभागाचे पोलीस नाईक सुयोग कांबळे, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे स्वप्नाली तुंबडा (म नोविकृती सामाजिक परिचारीका),शिक्षण विभागाचे जिल्हा समन्वयक रोहित सर, आनंद आश्रम हायस्कूल चे शिक्षक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नशाबंदी मंडळाचे मिलिंद पाटील यांनी सांगितले की पालघर जिल्ह्यांतील ८ तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी रॅली, चित्रकला स्पर्धा, तर अंमली पदार्थ विरोधी शपथ जिल्हा परिषद शाळा, महाविद्यालय, समाजकल्याण विभागातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली, यावेळी कार्यक्रमाची सांगता अंमली पदार्थ विरोधी शपथ घेऊन करण्यात आली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com