हसमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने नंदूरबार रेल्वे स्टेशन मधील अधिकारी , कर्मचारी यांचा उचित गौरव करण्यात आला..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर :– हसमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या विद्यमाने नंदूरबार येथे रेल्वे विभागात रे. सु.बल निरीक्षक पदावर कार्यरत असलेले बसंत राय यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा तसेच रेल्वे पो. आधिकारी आणि कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. हसमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या पालघरचे विक्रम गावंडे यांच्या शुभहस्ते हा गौरव करण्यात आला .


सदर कार्यक्रमाला बहुसंखेने रेल्वे कर्मचारी व गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. गजानन पाईकराव व सुरज पाटील हे होते. विक्रम गावंडे यांनी या कार्यक्रमा प्रति आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, आपण जे ही कमावतो त्याचा चौथा हिस्सा आपण समाज कार्यास दिला पाहीजेत ,जेणे करुन तळागाळातील लोकांना प्रगतिच्या मुख्य प्रवाहात आणता येईल व या सत्कारा मागील अर्थ इतकाच आहे की जे अधिकारी/ कर्मचारी आपली सेवा बजावताना उल्लेखनीय कार्य करतात त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हाच एक उपक्रम असतो. म्हणुन आमच्या संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रातील रेल्वे कर्मचारी, पोलिस आधिकारी यांच्या उचित कार्याची दखल घेऊन हा सतुत्य उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे,त्याच बरोबर भारतातील महापुरुषांच्या विचारांचा नेहमी आपल्या भारत वासियांना सहवास, लाभयला हवा म्हणून त्यांच्या विचारांच्या पाटया संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे स्थानकामध्ये या पाट्या लावण्याचाही उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. याची सुरुवात पालघर ते नंदूरबार पर्यंत झाली आहे आणि अशीच पुढे सुरू राहणार असेही विक्रम गावंडे म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन बसंत राय हे होते .त्यांचे मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की माझ्या कार्याची व सेवेची दखल समाजातील सजान नागरीक घेतात या बद्दल पालघरचे विक्रम गावंडे व त्यांच्या संस्थेचे पदाधिकारी यांचे कौतुक व्यक्त केले.
अशा सात्कारामुळे मला माझ्या कर्तुत्वाची जाणिव होऊन आणखिन चांगली सेवा देण्याची प्रेरणा मिळाली. विक्रम गावंडे यांनी कमी वयात ह्या बाबतीत समाजाप्रती बांधील राहणे ही त्यांच्या भविष्याप्रती खूप मोठी चाहूल आहे.बसवत राय ह्यानी आपले मनोगत वक्त केल. ह्यावेली राहुल शैजवाळ (सहाय्यक पोलिस निरीक्षक GRP), बाबूलाल (रेल्वे पो.कर्मचारी) व रगडे यांनी सर्व मान्यवराचे आभार मानले. या कार्यक्रमास प्रा.डॉ. गजानन पाईकराव सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com