सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांवच्या वतीने अतिदूर्गम व आदिवासी भागातील विदयार्थ्याना स्वेटर व नागरीकांना ब्लॅकेट चे वाटप…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :– “पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. निखील पिंगळे, यांच्या संकल्पनेतुन, आणि अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कैंप देवरी, श्री. नित्यानंद झा, श्री. संकेत देवळेकर,. उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग देवरी यांचे मार्गदर्शनाखाली सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव यांचे वतीने कम्युनिटी पोलीसींग दादालोरा एक खिडकी योजने अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात …

गोंदिया जिल्हयामध्ये सध्या थंडीचा पारा एकदम खाली गेलेला असताना गोंदिया जिल्हयामधील नागरीक यांना असहय थंडीचा त्रास सहन करावा लागत असताना सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव यांचे वतीने परीसरातील आदिवासी अतिदुर्गम भागातील गंधारी , उमरपायली , जांभळी , डोंगरगाव येथील अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेतील १३० विदयार्थ्याना उबदार स्वेटर व जॅकेट ची भेट देण्यात आली. तसेच सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव अंतर्गत गावांमधील गरजू १०० कुटुंबांना उत्कुष्ट दर्जाची ब्लॅकेट भेट म्हणून देण्यात आले. सदर उबदार स्वेटर , जॅकेट व ब्लॅकेट ची भेट सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव यांनी उडान ग्रुप गोंदिया व सहयोग ग्रुप गोंदिया यांचे सहकार्याने दिले…. .

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.अमोल गायकवाड समादेशक भारत राखीव बटालीयन २. विरसी कॅम्प गोंदिया हे होते . अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव यांच्या वतीने करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व यापुढे सुध्दा असेच उपक्रम राबवावेत जेणेकरून अतिदुर्गम भागातील सामान्य नागरीक मुख्य प्रवाहामध्ये येवू शकतील . तसेच उडान ग्रुप गोंदिया व सहयोग ग्रुप गोंदिया यांच्या कामाचे सुध्दा त्यांनी कौतुक केले . तसेच श्रीमती शितल रमादे अध्यक्षा , उडाण ग्रुप गोंदिया त्यांचे भाषणामध्ये त्यांची संस्था पे बॅक टू सोसायटी या संकल्पनेवर काम करीत असल्याचे सांगून विशेषतः महिला सबली करण व सक्षमीकरण यावर जास्त भर देत असल्याचे नमुद केले मात्र प्रथमच नक्षल ग्रस्त भागातील गरजू व्यक्तींना मदत करताना अतिशय आनंद होत असल्याचे त्यांनी नमुद केले . याप्रसंगी सहयोग हॉस्पीटलचे संचालक श्री रमन रमादे सहयोग ग्रुप ऑफ स्कुल चे श्री जे . के . लोखंडे , पो . स्टे केशोरी चे ठाणेदार श्री सोमनाथ कदम यांनी मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रम श्री. अमोल गायकवाड, समादेशक भारत राखीव बटालीयन २, बिरसी कॅम्प गोंदिया यांचे अध्यक्षतेखाली व मा. श्री. संकेत देवळेकर सा . उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी , श्री. सोमनाथ कदम, ठाणेदार पोलीस ठाणे केशोरी, श्री. रमन रमादे , संचालक सहयोग गृप गोंदिया, श्रीमती शितल रमादे अध्यक्षा, उडाण ग्रुप गोंदिया , डॉ . श्री. सौरभ वरधानी, सेंटर हेड सहयोग हॉस्पीटल गोंदिया,श्री.एच. आर. सिंग, पोलीस निरीक्षक भा.रा.ब. ०२ कॅम्प केशोरी , श्रीमती कुसुम चतुर्वेदी , उपाध्यक्षा उह्मण ग्रुप गोंदिया ,श्रीमती स्मिता सावंत, उपाध्यक्षा , उडाण ग्रुप , गोंदिया श्रीमती. प्राजक्ता डोंगरवार सचिव, उडाण पुप गोंदिया , श्रीमती राधिका बावरिया सचिव उडाण ग्रुप गोंदिया श्रीमती सलोनी खंडेलवाल खजिनदार , उडाण ग्रुप , गोंदिया यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पाडण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पो.उप.नि. श्री.सुनिल चव्हाण , प्रास्ताविक सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव चे प्रभारी अधिकारी सपोनि सचिन घाटे, यांनी व आभार प्रदर्शन पो.उप.नि. शुभम नवले यांनी केले .

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पो.हवा. भोवते, मठावी , मिसार, धेर, पुराम, अविनाश कटरे , तुरकर पोलीस नाईक राऊत , नखाते , वालदे व पो.शि. गभने , लिल्हारे यांनी परिश्रम घेतले .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट