25 वर्षापासुन मा.न्यायालयाने फरार घोषित केलेला छोटा शकील टोळीशी संबंधित खुनातील आरोपी अखेर पायधुनी पोलीसांच्या ताब्यात…

मुंबई:
प्रतिनिधी- महेंश वैद्य
पायधुनी पोलीस ठाणेने गुर क्र १३१/१९९७ कलम ३०२, ३४ भादवि सह कलम ३, २५ भा. ह. कायदा या गुन्हयातील २५ वर्षापासुन मा न्यायालयाने फरार घोषित केलेला छोटा शकिल टोळीशी संबधित खुनातील आरोपीतास अटक करण्यात मोठे यश आले आहे.
दिनांक ०२/०४/१९९७ रोजी सायंकाळी १६:३० वा च्या दरम्यान पायधुनी पोलीस ठाणे हद्दतील १७९-१८१, शरीफ देवजी स्ट्रीट, मुंबई ०३ या ठिकाणी आरोपी नामे लईक अहमद फिदा हुसेन शेख व त्याचे साथीदार यांनी मिळुन इसम नामे मुन्ना दाढी (छोटा राजन टोळी) याची गोळया झाडुन हत्या केली म्हणुन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पायधुनी पोलीस ठाणे गुर क्र १३१ / १९९७ कलम ३०२, ३४ भादवि सह कलम ३, २५ भा. ह. कायदा अन्वये दाखल केला होता.
सदरचा गुन्हा नोंद केल्यानंतर आरोपीतास अटक करण्यात आली होती.
त्यानंतर मा न्यायालयाने आरोपीतांना सन १९९८ साली जामीनावर मुक्त केले होते. सदर आरोपीतापैकी आरोपी नामे लईक अहमद फिदा हुसेन शेख वय ५० वर्षे (आताचे), रा.ठी. गाला नं ११३/११४, जॉली चेंबर जवळ, बैठी चाळ रोड, डोंगरी मुंबई ०९ हा सन १९९८ पासुन मा न्यायालयाचे सुनावणीकामी न्यायालयात हजर राहत नसल्याने त्यास फरार घोषित केले होते. नमुद फरार आरोपीताचा गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउनि संकल्प मोकल व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी वर नमुद पत्यावर जावुन त्याचा शोध घेतला असता तो सन २००४ पासुन नमुद पत्त्यावर राहत नसल्याचे समजले. त्याअनुशंगाने आरोपीताबाबत अधिक माहीती प्राप्त केली असता तो मुंब्रा परीसरात राहत असल्याची माहीती मिळाली होती.
परंतु नमुद आरोपी हा एकटा राहत असल्याने त्यास कोणीही ओळखत नव्हते, तसेच त्याचा कोणताही ठावठिकाणा नव्हता. तरी सुध्दा मिळालेल्या माहीतीच्या आधारे बऱ्याच दिवसांपासुन मुंब्रा परीसरात तपास करुन त्याठिकाणी गुप्त बातमीदार तयार करुन त्यांच्याकडुन मिळालेल्या माहीती नुसार तसेच तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपीताचा कोणत्याही प्रकारचा सध्याचा फोटो नसतांना तांत्रिक कौशल्याच्या आधारे त्यास योग्य ते शर्तीचे प्रयत्न करुन ठाणे रेल्वे स्थानक परीसरातुन सापळा रचुन खुनातील फरार आरोपीतास ताब्यात घेण्यात आले. सदर छोटा शकिल टोळीशी संबधित असलेला खुनातील आरोपी नामे लईक अहमद फिदा हुसेन शेख, वय ५० वर्षे हयास २५ वर्षानंतर नमुद गुन्हयात फेर अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्हयाचा तपास मा.अप्पर पोलीस आयुक्त, दप्रावि, डॉ. अभिनव देशमुख, आणि मा. पोलीस उपायुक्त सो, परिमंडळ-०२, डॉ. मोहित कुमार गर्ग, मा सपोआ श्रीमती जोत्स्ना रासम, पायधुनी विभाग, वपोनि श्रीकांत राजारामपाटील, पायधुनी पोलीस ठाणे, पोनि राहुल गौंड (गुन्हे), यांचे मार्गदर्शन व सुचना प्रमाणे, पोउपनि संकल्प मोकल (गुन्हे प्रकटीकरण अधिकारी), पोहक ०१६८२ / उमेश सुर्यवंशी, पोहक. ०३११८५ / शशांक चिले, पोहक्र ०५०३४८ / इमरान मुल्ला, पोहक ०६०३७० / संदीप पाटील, पोहक ०६१४७७ / धनराज पाटील, पोशिक्र ०८१०४२/गणेश ठाकुर, पोशिक ११०४६५ / सागर शेगर, पोशिक १३०२८८ / लिंबाजी इतापे पोहक. ०३५०५/मुन्ना सिंग (तांत्रिक मदत ) या पथकाने २५ वर्षापुर्वी खुनातील फरार असलेल्या आरोपीतास फेर अटक करुन कौशल्यपुर्ण व तांत्रिक पध्दतीने तपास केला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com