वयोवृध्द पेन्शनधारकांना ट्रेझरी ऑफिसमधुन बोलत असल्याचे सांगुन फसवणुक करणाऱ्या भामटयाला २४ तासात सातारा शहर पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

सातारा :-दिनांक १३/०५/२०२४ रोजी फिर्यादी सतिश ज्ञानदेव चोरगे वय ६७ वर्षे यांनी समक्ष पोलीस ठाणेस हजर राहुन तक्रार दिली की, शिवम चौगुले या इसमाना ट्रेझरी ऑफिस, सातारा येथुन बोलत असल्याचे भासवुन पेन्शन फरकाचे पैसे मिळणार असून त्याकरीता वाढवुन आलेल्या पेन्शनचे पैसे भरा असे सांगुन फिर्यादी व साक्षीदार यांची ७१,९००/- रुपयाची फसवणुक केली आहे. सदरबाबत तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला.

गुन्हयातील आरोपीने फक्त मोबाईल फोनव्दारे संपर्क करुन ऑनलाईन सेवा देणा-या शॉपमधुन रोखीने पैसे घेतले असल्याने आरोपीचा शोध घेणे पोलीसासमोर आव्हान तयार झाले होते. वपोनि मस्के यांनी तात्काळ दोन तपास पथके तयार करुन मोबाईल नंबरचा तांत्रिक तपास व पैसे पाठविलेल्या इसमाचा शोध घेवून आरोपी सोयब आशपाक शेख, वय २८ वर्षे, रा.४११, करंजे तर्फ, सातारा यास सिव्हील हॉस्पिटल, सातारा येथुन दिनांक १४/०५/२०२४ रोजी सापळा रचुन ताब्यात घेवुन चौकशी केली असता तीच शिवम चौगुले नाव सांगुन फसवणुक करीत असल्याचे निष्पन्न झाले त्यास गुन्हयात अटक केली आहे.

अशाप्रकारे सातारा शहर पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी संवेदनशील गुन्हा गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीचे आधारे २४ तासात उघडकीस आणला आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक सो, सातारा श्री समीर शेख, मा. अपर पोलीस अधिक्षक सो, सातारा श्रीमती आंचल दलाल व मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सो, सातारा विभाग राजीव नवले यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि राजेंद मस्के, पो.नि. (गुन्हे) एन.बी.तांबे, पोउपनि.एस.बी.मोरे, पोहवा. श्री देशमुख, राहुल घाडगे, सुजित भोसले, निलेश जाधव, पोना. पंकज मोहिते, विक्रम माने, पोशि अजिंक्य माने, तुषार भोसले, संतोष घाडगे, इरफान मुलाणी, सुशांत कदम, विशाल घुमाळ यांनी केली आहे.

नागरीकांना आवाहन.

वयोवृध्द पेन्शनधारकाना ट्रेझरी ऑफिस, सातारा येथुन बोलत असल्याचे सांगुन फसवणुक झाली असल्यास सदरबाबत तक्रार देणेकरीता तात्काळ सातारा शहर पोलीस ठाणेस संपर्क साधावा. सदरबाबत तात्काळ कडक कायदेशीर करवाई करण्यात येईल.
ट्रेझरी ऑफिस किंवा इतर कोणत्याही शासकीय कार्यालयातून बोलत असल्याचे सांगुन पैश्याची मागणी करत असल्यास संबंधित विभाग किंवा पोलीस ठाणेस संपर्क साधवा अशा प्रकारे कोणत्याही शासकीय कार्यालयातून पैश्याची मागणी केली जात नाही याबाबत नागरीकांनी सर्तक राहावे असा प्रकार आढळून आल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क करावा.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट