वृद्धाश्रमातील दागिने चोरणाऱ्या केअर टेकरच्या हिंजवडी पोलीसांनी आवळल्या मुसक्या..

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

पुणे: ३१/१०/२०२२ वृध्दाश्रमातील सोन्याचे दागीने चोरणाऱ्या केअर टेकरला अटक, त्याचेकडून चोरीचे २,३५०००/- रू किं. चे दागीने हस्तगत – हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाची अतिशय उल्लेखनीय
कामगीरी

दि. १६/१०/२०२२ रोजी फिर्यादी नामे सौ. गोकर्णा बाबासाहेब बाभळकर, वय ४४, रा. सनं ६५, प्लॅ नं २९, ऑडी शोरूमजवळ, रावी नगर, सुस, ता. मुळशी, जि. पुणे यांनी तक्रार दिली की, ते वरील पत्त्यावर जीव्हाळा वृध्दाश्रम चालवितात, त्यांना सदर कामात मदत करण्यासाठी केअर टेकर नामे संकेत माणीकराव झाडे, वय २०, रा. सदर, मुळ रा. मुपो खोक, ता. जिंतुर, जि. परभणी हा सोबत असतो. त्यांनी दि. १९/०८/२०२२ रोजी दु. १२:३० वा. चे सुमारास किचन रूममध्ये ४७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने ठेवले होते. त्यानंतर केअर टेकर नामे संकेत माणीकराव झाडे हा अचानक दि. ११/१०/२०२२ रोजी त्याचे गावी गेला. त्यानंतर दि.१६/१०/२०२२ रोजी त्यांनी दागीने पहाता ते मिळून आले नाहीत. म्हणून त्यांनी संकेत झाडे याचेविरुध्द दिलेल्या तक्रारीवरून हिंजवडी पोलीस ठाणे ९८०/२०२२ भा.द.वि.कलम ३८१ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हा हा वध्दाश्रमाशी निगडीत संवेदनशिल असल्याने अपर पोलीस आयुक्त श्री. डॉ. संजय शिंदे साहेब यांनी गुन्ह्याचा छडा लाऊन गुन्हयातील दागीणे जप्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस ठाणे पिं चिं यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राम गोमारे यांनी सदर गुन्ह्याचा तात्काळ तपास चालु करून तपास पथकातील अंमलदार स्वामीनाथ जाधव, सहा.पो.फौज. व पोना. १५७६ नरळे, पोना १७४८ गडदे, यांचे पथकास मु.पो. खोक, ता. जिंतुर, जि. परभणी येथे पाठऊन आरोपी संकेत माणीकराव झाडे, वय २०, यास ताब्यात घेऊन त्यास दाखल गुन्ह्यात दि. १८/१०/२०२२ अटक करण्यात आली. त्याची एकूण ६ दिवसांची पोलीस कोठडी रिमांड घेऊन त्याला विश्वासात घेऊन गुन्हयात चोरी गेलेले ४ सोन्याच्या अंगठ्या, १ ब्रेसलेट व १ चेन हे दागिणे जप्त केले आहेत.

सदरची कारवाई मा.श्री.अंकुश शिंदे सो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा.डॉ संजय शिंदे साो, अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा.आनंद भोईटे, पोलीस उप आयुक्त परि. २, पिंपरी चिंचवड मा.श्रीकांत डिसले, सहा.पोलीस आयुक्त, वाकड विभाग वाकड, यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डॉ.विवेक मुगळीकर, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोउनि, रमेश पवार, पोलीस अंमलदार स्वामिनाथ जाधव, बाळकृष्ण शिंदे, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सागर पंडीत यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट