पालघरच्या उत्तर दिशेला जुना फाटक म्हणून ओळख असलेला बंद फाटक ओलांडताना ३ तरुणांपैकी २ तरुणांचा ट्रेनच्या धडकेने मृत्यू…!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर :

पालघर रेल्वे स्थानकाच्या उत्तरेस जुना फाटक म्हणून ओळख असलेला फाटक हा सद्या बंद आहे. हा फाटक ओलांडताना दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला. या अपघातात एक सहकारी बचावला असून त्याला दुखापत झाली आहे. बोईसर पूर्वेला एका उद्योगात वेल्डिंग व इतर काम करणारे बिहार राज्यातील मोतीयारी जिल्ह्यातील तीन तरुण सुट्टी निमित गृहपयोगी वस्तूंची खरेदी करण्यासाठी पालघर शहरात आले होते. पूर्वेकडे जाण्यासाठी बंद असणारे फाटक ओलांडताना उपनगरीय गाडी आल्याने दोन रुळाच्यामध्ये असणाऱ्या जागेत तिघांपैकी दोघे थांबून राहिले. तेवढ्यात दुसऱ्या बाजूने भरधाव गाडी आल्याने या गाडीचा धक्का लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळताच. रेल्वेचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मृतांचा नावाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. काही दशकांपासून पालघर रेल्वे फाटक बंद करण्यात आले असले तरीही पूर्वेस व पश्चिमेस मोठी लोकवस्ती तसेच औद्योगिक क्षेत्र असल्याने त्यांना पर्यायी मार्ग नसल्याने रेल्वे फाटक ओलांडून शेकडो नागरिक जीव मुठीत घेऊन पूर्व- पश्चिम प्रवास करावा लागत असल्याने पर्यायी मार्ग म्हणून पदचारी फुल बांधून द्यावे ही तिथल्या ग्रामस्थांना चे प्रशासनाला मागणी करत आहेत.



ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट