ऑफीस मधुन चोरी करणारे आरोपी रोहीत देशपांडे व प्रणव पोवार शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

कोल्हापूर ;

पोलीस ठाणे
शाहूपुरी

२५/२०२५ बीएनएस कायदा कलम ३०५ (अ) अन्वये

मीना रामचंद्र कागीनकर वय ५२ धंदा नोकरी विएसेन एल पत्ता प्लॉट नं. १८४ साळोखेनगर कळंबा, कोल्हापूर,

गुन्हा घडला तारीख वेळ व ठिकाण

जप्त मुद्देमाल

माहिती कशी प्राप्त झाली

२९/११/२०२४ रोजी सायंकाळी ०४.३० ते दिनांक १६/१२/२०२४ रोजी सकाळी १०.४५ वा. चे सुमारास टेलिफोन भवन ताराबाई पार्क, कोल्हापूर. येथील भारत संचार निगम लिमिटेड या ऑफिस मध्ये ३०० किलो तांब्याची तार एका किलोची किंमत १२००/- प्रमाणे असा एकूण ३,६०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

गोपनीय बातमीदार
गेला माल -३,६०,०००/- रुपये किमतीची १५ आयडल केबल वायर त्यामध्ये प्रत्येक केबल वायरचे अंदाजे वजन २० किलो प्रमाणे एका किलोची किंमत १२००/-

कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार

मा. पोलीस अधीक्षकसो श्री. महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक श्रीम. जयश्री देसाई पोलीस उपाधीक्षक श्री. अजित टिके पोलीस निरीक्षक श्री. संतोष डोके सहाय्यक फौजदार संदीप जाधव, तानाजी चौगुले, मिलिंद बांगर, महेश पाटील, सुशील गायकवाड, सनिराज पाटील, विकास चौगले, रवी आंबेकर, बाबा ढाकणे.

आरोपीचे नाव व पत्ता –

१) रोहित संजय देशपांडे वय ३४ रा. कोडणी ता. चिक्कोडी जिल्हा बेळगाव

२) प्रणव संभाजी पोवार वय २८ रा. कोगील खुर्द ता. करवीर जिल्हा कोल्हापूर.

हकीकत- दिनांक ०९/०/२०२५ रोजी टेलिफोन भवन ताराबाई पार्क, कोल्हापूर. येथील भारत संचार निगम लिमिटेड या ऑफिस मधून दिनांक २९/११/२०२४ रोजी सायंकाळी ०४.३० ते दिनांक १६/१२/२०२४ रोजी सकाळी १०.४५ वा.पर्यंत ३,६०,०००/- रुपये किमतीची १५ आयडल केबल वायर त्यामध्ये प्रत्येक केवल वायर चोरीस गेले बाबत मीना रामचंद्र कागीनकर वय ५२ धंदा- नोकरी बिएसेन एल पत्ता प्लॉट नं. १८४ साळोखेनगर कळंब कोल्हापूर यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर येथे फिर्याद दिले प्रमाणे शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर येथे गु.र.नं. २५/२०२५ बीएनएस कायदा कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करणेत आलेला होता. सदर दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी डी. बी. पथकास सूचना देऊन गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन केले.

सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि सदर गुन्हा हा त्यात ऑफिस मध्ये काम करणाऱ्या रोहित संजय देशपांडे व प्रणव संभाजी पोवार यांनी केलेला आहे. त्याप्रमाणे सदर दोन्ही संशयित यांना तावेत घेऊन चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेऊन तसे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी वेळोवेळी चोरलेला माल हा त्यांनी सदर बाजार येथील भंगार व्यावसायिक जमीर अकबर पटवेगार यास विकल्याचे कबूल केले. जमीर अकबर पटवेगार यास तावेत घेऊन त्याच्या दुकानाची झडती घेतली असता त्याच्या जवळ तांब्याची वायर असलेली पोती मिळून आली. त्याच्या बाबत विचारले असता त्याने सदर वायर ह्या रोहित संजय देशपांडे व प्रणव संभाजी पोवार यांनी मला विकल्या होत्या त्या मी जाळून त्यातील ताब्याच्या तारा ह्या पोत्यात घालून ठेवल्याचे सांगितले.

त्याप्रमाणे ३०० किलो तांब्याची तार एका किलोची किंमत १२००/- प्रमाणे असा एकूण ३,६०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संदीप जाधव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट