महाडमध्ये शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपाह वक्तव्य ठाकरे गटाकडून कोश्यारीं विरोधात जोडेमारो आंदोलन…
प्रतिनिधी-रेश्मा माने
महाड: महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. वंदनीय सावित्रीबाई फुले व मराठी माणसांविषयी अपशब्द वापरल्यामुळे मागेही त्यांना महाराष्ट्रीयन जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.
आता तर त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एका जाहीर कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असून सर्वत्र त्यांचा जाहीर निषेध व जोडेमारो आंदोलन व त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
या निमित्त महाडमधील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राज्यपालांचा जाहीर निषेध व जोडमारो आंदोलन करण्यात आले .
यावेळी राज्यपालांविरोधी जोरदार घोषणाबाजी करून राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली.
यावेळी पक्षातर्फे महाराष्ट्र वाहतूक सेना दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे, दक्षिण रायगड जिल्हा युवासेना अधिकारी चेतन पोटफोडे, उपतालुका प्रमुख शिवाजी शिंदे ,महिला तालुका संघटिका वर्षा कालप , शहर संपर्कप्रमुख विजय तांबट,इत्यादी पदाधिकारी,कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com