कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीतील मोका गुन्ह्यातील पाहिजे आरोपी पांडया मोहीते यास सांगली येथून ताब्यात घेवून केले अटक

0
Spread the love

पुणे

सह संपादक – रणजित मस्के

कोथरुड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९ ११८(१),११८ (२),१२६(२),१११ (३),१११ (४),१११ (६), १११ (७), ३ (५) सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम १९९९ चे कलम ३(१) (ii), ३(२), ३(४),४ या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१, श्री. गणेश इंगळे, हे करीत आहेत.

नमुद गुन्ह्यातील अटक आरोपी नामे गजानन पंढरीनाथ मारणे यास मा. मोका न्यायालयाने दिनांक ०३/०३/२०२५ रोजी ज्युडिशियल कस्टडी मंजुर केली होती. नमुद आरोपीस सुरक्षिततेच्या कारणास्तव सांगली मध्यवर्ती कारागृह मध्ये आरोपी पार्टीसह शासकीय वाहनाने पाठविले असता गजानन मारणे टोळीतील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे बाळकृष्ण ऊर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते वय-४० वर्षे रा. एस. टी. स्टॅण्ड रोड, उमा लेले यांचे खोलीत, सितारामनगर, सांगली व त्यांचे टोळीतील इतर साथीदारांनी पुणे, सातारा व सांगली येथील ४० ते ५० इसमांना गोळा करुन त्यांच्या टोळीचे वर्चस्व कायम ठेवणेसाठी व सदर परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी आरोपीस घेवुन जाणा-या शासकीय वाहनाच्या पाठीमागे जावून आरोपीस आर्थिक व इतर प्रकारचे सहाय्य केल्याचे उपलब्ध सीसीटिव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषण यावरुन निष्पन्न झाले आहे.

आरोपी गजानन मारणे यास आर्थिक व इतर प्रकारचे सहाय्य करणा-या पाहिजे आरोपींचा शोध गुन्हे घेणेसाठी भा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) पुणे शहर, श्री. निखील पिंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची पथके तयार करून त्यांना रवाना करण्यात आलेले होते. त्यानुसार गजानन भारणे टोळीतील सक्रिया सदस्य बाळकृष्ण ऊर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते वय-४० वर्षे रा. एस. टी. स्टॅण्ड रोड, उमा लेले यांचे खोलीत, सितारामनगर, सांगली वास तांत्रिक विश्लेषण करुन सांगली येथून दिनांक १४/०५/२०२५ रोजी पहाटे ०४/०० वाजता ताब्यात घेवुन गुन्हे शाखा पुणे येथे आणून त्याचेकडे गुन्ह्याबाबत तपास करता त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास दिनांक १४/०५/२०२५ रोजी १२/३० वाजता अटक करण्यात आलेली असून त्यास मा. मोका न्यायालयाने दि.१७/०५/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेशकुमार, मा.सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री निखील पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ श्री गणेश इंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-२ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार मोकाशी, कुंभार यांचे पथकाने केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट