कुख्यात गुंड नामे- राजेश उर्फ राजा सुदर्शन भारती राहणार देवरी, जिल्हा- गोंदिया याचेवर ( एम.पी.डी.ए.) अंतर्गत कारवाई

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

गोंदिया

( एक वर्षाकरीता मध्यवर्ती कारागृह, अमरावती जिल्हा अमरावती येथे केले स्थानबध्द )

⏩… याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस स्टेशन देवरी हद्दद्दीतील धोकादायक गुंड इसम नामे- राजेश ऊर्फ राजा सुदर्शन भारती, वय 42 वर्षे, रा. देवरी, ता. देवरी. जिल्हा. गोंदिया हा पोलीस ठाणे देवरी अंतर्गत हददीमध्ये शरीराविरुध्द, मालमत्ते विरुध्द गुन्हे करीत असून अवैध जुगार व्यवसाय चालवित असल्याने सदर इसमांविरुद्ध पोलीस ठाणे देवरी येथे विविध प्रकारच्या 16 गंभीर गुन्ह्याची नोंद असून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

🔹….. सदर कुख्यात गुंड इसम हा आपल्या नवनवीन गुंड साथीदारासह रात्री- अपरात्री आपल्या हातामध्ये घातक हत्यारे घेवुन पोलीस ठाणे हद्दीतील गरीब कामगार, सर्वसामान्य नागरीक, सर्वसामान्य व्यवसायिक तसेच व्यापारी यांना हत्याराचा धाक दाखवुन लोकांमध्ये दहशत माजवुन त्यांना मारहाण करून लुटण्याचे काम करीत असल्यामुळे या भागातील नागरीक भयग्रस्त झाले असल्याने त्यांना आपले दैनंदिन कामकाज करणे सुध्दा भितीदायक झाले होते. तसेच ईतर तरुण मुलांना आपले सोबत ठेवुन त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीचे बनवुन त्यांचेकडून बेकायदेशीर कृत्ये करवून घेण्याचा त्याचा हेतु असल्याबद्दल भिती किंवा वाजवी संशय उत्पन्न करण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्याचे असे कृत्यामुळे त्याचे घरातील लोकांना, नातेवाकांना, मोहल्यातील महीलांना तसेच त्याचे स्वताचे पत्नीला सुध्दा त्याचेपासुन धोका निर्माण झाला होता. सार्वजनिक ठिकाण, शासकीय कार्यालय, रुग्णालयात काम करणा-यांना सुध्दा आपले दैनंदीनी कामकाज करणे अवघड झाले होते. तसेच त्याचे विरोधात गेल्यास तो आपल्याला धमकावुन जिवानीशी ठार मारेल अशी भिती सुध्दा त्यांचे मनात निर्माण करुन त्याने देवरी भागात आपली दहशत निर्माण केली होती. त्याचेवर वारंवार गुन्हे नोंद तसेच प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्याचेवर कोणताच बदल झाला नसल्याने त्याने आपली गुन्हेगारी प्रवृत्ती सुरूच ठेवली होती. त्याचेविरुध्द करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा भंग करून स्थानबध्द इसम हा पुन्हा गुन्हे करीत होता. यावरून त्यास प्रचलित कायदयाची कोणतीही भिती नसल्याचे दिसुन येत होते. तसेच पोलीसांनी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांनी वेळोवेळी केलेल्या कायदेशिर कारवाईचा सकारात्मक परीणाम स्थानबध्द इसमाचे वर्तणुकीत झाला नव्हता. उलट दिवसागणित त्याचे अवैध कृत्ये वाढत चाललेली होते. त्यामुळे कलम 3 (1) महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले व औषधी द्रव्ये विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, अवैध वाळु तस्करी करणारे तसेच अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती, यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 (सुधारीत 2015) नुसार मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी साो. गोंदिया. यांचेकडे “धोकादायक व्यक्ती” अन्वये एका वर्षाकरीता स्थानबध्दतेचा आदेश होणेस प्रस्ताव पाठविला असता मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. प्रजित नायर, सा. यांनी इसम नामे- राजेश ऊर्फ राजा सुदर्शन भारती, रा. देवरी, जिल्हा. गोंदिया यास आदेश क्र. अ. का. गृह/292/2025/ दिनांक 07/05/2025 रोजी चे आदेशान्वये मध्यवर्ती कारागृह अमरावती, जिल्हा अमरावती येथे स्थानबध्दतेत ठेवण्याचे आदेश निर्गमीत झाल्याने सदर इसमास मध्यवर्ती कारागृह अमरावती कारागृह येथे दाखल करण्यात आले आहे .

🕹️. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक गोंदिया, मा. श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग देवरी श्री. विवेक पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे देवरी चे पोलीस निरिक्षक श्री. प्रवीण डांगे, स्था. गु. शा. गोंदिया येथील पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्या. देवरी येथील अंमलदार देवचंद सोनटक्के, पो. ठाणे देवरी मपोशि निता कांबळे, तसेच स्थानिक गुन्हे शाखा गोदिया येथील प्रतिबंधक सेलचे म.पो. उप. नी. वनिता सायकर, अंमलदार पो.हवा. प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी कार्यवाही पार पाडली.

🔹….. सदर कारवाईमुळे पोलीस ठाणे देवरी परिसरातील गुन्हेगारांमध्ये चांगलीच दहशत पसरली असुन सदर कारवाईचे परिसरातील लोकांनी स्वागत कौतुक केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट