पोलीस बांधवांना टार्गेट करणाऱ्या आ.नितेश राणेंना म.पोलीस बाॅईज संघटनेचा इशारा…

उपसंपादक-रणजित मस्के
नवी मुंबई :-स्वतः मध्ये एवढी धमक आहे ना, तर स्वताचे पोलीस संरक्षण काढून ह्यापुढे पोलीस बांधवांवर बोलून दाखवा असा थेट इशारा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना “नवी मुंबई शहर अध्यक्ष मयुर कारंडे” ह्यांनी “नितेश राणे” ह्यांना दिला.
राज्यात ज्या पण बलात्काराच्या घटना घडत आहेत, त्या खरंच खुप वेदनादायक आहेत, त्यावर कड़क कारवाई झाल्याच पाहिजे, परंतु ह्या सर्व गोष्टींच खापर सर्व पोलीस बांधवांवर जर फोडणार असेल तर ते “महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना” खपवून घेणार नाही.
काही राजकीय महाशय पोलिसांच्या कुटुंबा पर्यंत जाऊन धमकी द्याला लागले आहेत, आपली राजकीय पोळी भाजायच्या उद्देशाने, स्वतःची पात्रता दाखवू नका, पोलिसांवर आणि त्यांच्या कुटुंबावर बोलायच्या अगोदर हे विसरु नका की, त्या आरोपींना पकडून आणणारे आपले पोलीस च आहेत.
आणि एवढीच स्वतः मध्ये धमक आहे ना, तर अगोदर स्वतःचे पोलीस संरक्षण काढ़ा आणि त्यानंतर पोलिसांवर बोलून दाखवा, मग आम्ही दाखवतो “महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना” काय आहे ते, असा खोचक ईशारा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, “नवी मुंबई शहर अध्यक्ष:- मयुर कारंडे” ह्यांनी दिला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com