पंचक्रोशी प्रीमियर लीग 2023 वर अनुक्रमे निलेश इलेव्हन व प्रियांशू इलेव्हन संघाचा ताबा…

0
Spread the love

प्रतिनिधी-सचिन घाणेकर

चिपळूण (वार्ताहर ) : पंचक्रोशी प्रीमियर लीग 2023 ओव्हर क्रिकेट स्पर्धा १ व २ एप्रिल रोजी पार पडली. या पंचक्रोशी प्रीमियर लीग स्पर्धेवरती निलेश इलेव्हन संघाने आपलं नाव कोरल असून द्वितीय क्रमांकाचा मानकरी प्रियांश इलेव्हन संघ ठरला आहे.
स्पर्धेतील तृतीय क्रमांक साई स्टार संघ तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी विठ्ठल रुक्माई संघ ठरला आहे.

स्वाभिमान पंचक्रोशीचा.. अभिमान खेळाडूंचा या ब्रीदवाक्यानुसार कळंबट, केरे, पातेपिलवली, मुर्तवडे, खांडोत्री, आबिटगाव, निवळी, पालवण, ढोक्रवली, वीर, तोंडली, गुळवणे, तुरंबव, ढाकमोली, वारेली, धायजे पिळवली, पुर्यें, शिरबे, वडेरु या गावातील खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता ,एकूण १२ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.

यातूनच झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये निलेश इलेव्हन संघ आणि प्रियांशु इलेव्हन संघ यांच्या दरम्यान पार पडला. प्रथम फलंदाजी करताना निलेश इलेव्हन संघांने ३५ धावांचे आव्हान ४ षटकांमध्ये उभे केले होते. याला प्रतिउत्तर देताना प्रियाशु इलेव्हन संघाने मात्र 25 धावाच केल्या. त्यामुळे दहा धावांनी निलेश ईलेव्हण संघ या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.

त्याचबरोबर तृतीय संघ साई स्टार तरच चतूर्थ क्रमांकाचा मानकरी विठ्ठल रखुमाई संघ ठरला. मालिका वीर म्हणून निलेश इलेव्हन संघाचा प्रदीप कातकर, उत्कृष्ट फलंदाज प्रफुल खापले आणि उत्कृष्ट गोलंदाज अमित घडशी यांना वैयक्तिक पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

संघाच्या प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या निलेश इलेव्हन संघाला रोख रक्कम 20 हजार व आकर्षक चषक, द्वितीय विजयी संघ प्रियांशु इलेव्हनला १५ हजार आणि चषक, तृतीय साई स्टार संघाला 3 हजार व चषक आणि चतुर्थ विठ्ठल रखुमाई संघाला सुद्धा 3 हजार व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.

ही स्पर्धा ही दि. लक्ष्मण पवार क्रीडांगण खांडोत्री येथील भव्य मैदानावरती पार पडली. या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला कळंबट तंटामुक्त समिती अध्यक्ष सुचित शिरकर, कुणबी युवा चिपळूण तालुका अध्यक्ष पत्रकार भाई कुळे, सहदेवजी बेटकर कुणबी समाज नेते, राजू दळवी, डॉ. प्रथमेश कोकमकर, डॉ. पराग पावरी, खांडोत्री माजी सरपंच सखाराम सुवरे, सचिनदादा मोरे,मोहन मांडवकर, सुरेश पवार, आत्माराम पवार,डॉ.पराग पावरी, पत्रकार दिपक कारकर, सुहास भागडे, सुरेश खापले, शरद शिगवण, दीपक भागडे, सुरेश पवार आणि इतर मंडळी सुद्धा उपस्थित होती.

या स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण पवार व स्वप्निल धामणस्कर यांनी उत्तम कामगिरी पाहिली. तर समालोचक म्हणून विक्रांत टेरवकर यांनी सर्व खेळाडूंना खुश केले. ही स्पर्धा पार पाडण्यासाठी सजय कोकमकर, अमोल कोदारे, रमेश नेवरेकर, सुशांत धामापूरकर, प्रविण खांडेकर, संतोष पवार, तसेच संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन सचिन घाणेकर यांनी केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *