कुत्र्याला वाचवण्यासाठी बाईक स्लीप होऊन गंभीरित्या अपघात झालेल्या निल हेन्द्रेचा उपचारादरम्यान मृत्यू…

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड :-दिनांक ३१ जुलै रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज समोर बुटाला पेट्रोल पंपा शेजारी सर्व्हिस रोडवर मोटारसायकलच्या आडवा कुत्रा आल्याने मोटरसायकल घसरुन उभ्या असलेल्या टँकरला मोटरसायकलची धडक बसून भिषण अपघात घडला होता.

या अपघातामध्ये महाड दादली येथील युवक निल आचल हेन्द्रे वय वर्षे १८ हा गंभीररीत्या जखमी झाल्याने निल याच्यावर महाड येथील रानडे हॉस्पिटल मध्ये प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

अपघातामध्ये नील याच्या पायाला व डोक्याला जबर दुखापत झाल्याने निल याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश आले नाही .

अखेर निल याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेने आई वडीलांचा लाडका निल जग सोडून गेल्याने निलच्या आई वडिलांसह महाडकरांवर दुखःचे डोंगर कोसळले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट