कराड मधील सराईत गुन्हेगार सोमा ऊर्फ सोमनाथ सुर्यवंशी व त्यांच्या साथीदार यांचे विरुध्द मोक्का कायदयाअन्वये कारवाई..

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :- श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी सातारा जिल्हयामध्ये तसेच कराड परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत करुन सराईत गुन्हेगार, टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायदयाकरीता संघटीतपणे गुन्हे करणान्या गुन्हेगारांविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये प्रभावी करावाई करण्याबाबत जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना सुचना दिलेल्या आहेत.
कराड शहर पोलीस ठाणे गुरनं १२१५/२०२३ भादविस कलम ३०७, ३८७, ३२६, ३२४, ५०४, ५०६, ३४, शस्य अधि. कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्हयातील फिर्यादी हे जेवण करुन निघाले असताना यातील टोळी प्रमुख आरोपी सोमा ऊर्फ सोमनाथ सुर्यवंशी व त्यांचे साथीदार टोळी सदस्य आरोपी रविराज पळसे व आर्यन सुर्यवंशी यांनी फिर्यादीस दुर्गा देवीची वर्गणी का दिली नाहीस, तुला मस्ती आलो आहे का ? असे म्हणून गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ, दमदाटी करुन फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी मारहाण करुन त्याचेजवळ असलेल्या कोयत्याने, विअरच्या बाटलीने फिर्यादी याचेवर वार केला. माणून वगैर दिले हकीगतीवर कराड शहर पोलीस ठाणेत गुन्हा रजि. नोंद करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयाच्या तपासामध्ये टोळी प्रमुख आरोपी क्रमांक
१) सोमा ऊर्फ सोमनाथ अधिकराव सुर्यवंशी वय ३३ वर्ष रा.हजारमाची, ओगलेवाडी, ता. कराड जि. सातारा, टोळी सदस्य आरोपी क्रमांक
२) रविराज शिवाजी पळसे वय २७ वर्ष रा. हजारमाची, ओगलेवाडी, ता.कराड जि. सातारा, आरोपी क्रमांक
३) आर्यन चंद्रकांत सुर्यवंशी वय १९ वर्षे रा.हजारमाची, ओगलेवाडी, ता. कराड जि.सातारा यांनी टोळीची दहशत निर्माण करुन आपल्या आर्थिक व इतर फायदयाकरीता संघटीतपणे गुन्हे केलेले असल्याचे निष्पन्न झालेने पोलीस निरीक्षक प्रदिप सुर्यवंशी कराड शहर पोलीस ठाणे गांनी नमुद टोळी विरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती संकलित केली असता त्यांचेवर जुलुम जबरदस्ती करुन हिंसाचाराचो धमकी देऊन किंवा अन्य अवैध्द मार्गाने दहशत व बळाचा वापर करुन खुन, खुनाचा प्रयान, अपहरण करुन जबर दुखापत, जबरी चोरी, जबर दुखापत, साधी दुखापत, विनयभंग, खंडणी, अवैध्द शस्त्र बाळगणे, शिवीगाळ करुन दमदाटी करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने सदर आरोपींचेविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये कारवाई करीता मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांचे मार्फतीने मा.विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापुर यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला.



मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी सदर टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचे कागदपत्रांचे अवलोकन करुन मोक्का प्रस्तावाची पडताळणी करुन सदर गुन्हयास मोक्का कायदयान्ययेची कलम वाढ करणेची परवानगी देवून गुन्हयाचा पुढील तपास श्री. अमोल ठाकुर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड यांच्याकडे देण्यात आलेला आहे.
माहे नोव्हेंबर २०२२ पासुन ०९ मोक्का प्रस्तावामध्ये ११२ इसमांविरुध्द मोक्का कायदया अंतर्गत कारवाई केली असुन ५८ इसमांविरुध्द हद्दपारी सारखी व ०१ इसमास MPDA कायदयान्यये स्थानबध्द करणेत आलेले आहे. तसेच भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचे विरुध्द मोक्का, हददपारी, MPDA अशा प्रकारच्या कठोर कारवाई करणेत येणार आहेत.
मोक्का प्रस्ताव मंजुरी करीता श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व औचल दलाल अपर पोलीस अधीक्षक, सातारा, यांचे मार्गदर्शनाखाली अमोल ठाकुर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड, अरुण देचकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, तत्कालीन पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे प्रदिप सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील कराड शहर पोलीस ठाणे, सपोनि संदीप शितोळे कराड शहर पोलीस ठाणे, पोउनि राज डांगे, पंतग पाटील, जी. पोउनि संजय देवकुळे, तसेच पो.हवा अमित सपकाळ स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस शिपाई आनंदा जाधव कराड शहर पोलीस ठाणे महिला पोलीस शिपाई सोनाली पिसाळ कराड शहर पोलीस ठाणे या पोलीस अंमलदारांनी मोक्का कारबाईकरीता सहभाग घेतला आहे
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com