नव्या रूपातील फ्लाईंग राणी एक्सप्रेसमधून पुन्हा पासधारकांना करता येणार प्रवास…

प्रतिनिधी-महेश वैद्य
पालघर:- गाडीच्या रुपात बदल, सुरक्षा वाढली परंतू आसनं कमी झाली
दिनांक 16 जुलै :- फ्लाईंग राणी नवीन रुपात 16 जुलैपासून एलएचबी तंत्रज्ञानाचे आधुनिक बनावटीचे डबे बसविण्यात आले आहेत. या डब्यांमुळे ही गाडी आता प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित बनल्याचा दावा रेल्वेने केला आहे.
फ्लाईंग राणी एक्सप्रेसमधून पुन्हा पासधारकांना प्रवास करता येणार, गाडीच्या रुपात बदल, सुरक्षा वाढली परंतू आसनं कमी झाल्याची खंत डी आर यु सी सी सदस्य केदार काळे यांनी व्यक्त केली
मुंबई सेंट्रल ते सुरत धावणारी देशातील पहिली डबल डेकर (ट्रेन क्र. 12921/12922 ) फ्लाईंग राणीचं ( Flying Rani Express ) रुपडं रविवारपासून बदलले आहे. मुंबई सेंट्रल येथे रेल्वेराज्य मंत्री दर्शना जरदोश ( Darshana jardosh ) यांच्या हस्ते नव्या रुपातील एलएचबी डब्यांच्या ( LHB COACH ) फ्लाईंग राणीचे उद्घाटन करण्यात आले. ही गाडी मुंबई ते सुरत असा रोजचा प्रवास करणाऱ्या नोकरी करणाऱ्या प्रवाशांना , व्यापाऱ्यांना, विद्यार्थी आणि कामगारांची आवडती गाडी म्हणून ओळखली जात होती. आता तिचे दुमजली डबे काढून तिला एलएचबी तंत्रज्ञानाचे डबे लावले आहेत.

नव्या रुपातील मुंबई सेंट्रल ते सुरत फ्लाईंग राणी एक्सप्रेसला आता एसी चेअर कार ( रिझर्व्ह ), सेंकड क्लास सिटींग कोच ( 7 कोच आरक्षित (1 कोच फर्स्ट क्लास मासिक रेल्वे पासधारकांसाठी आणि 6 कोच अनारक्षित ) जनरल सेंकडक्लास कोच (1 कोच जनरल , 1 कोच सेंकड क्लास रेल्वे पासधारकांसाठी , 1 कोच महिलाप्रवाशांसाठी तर 1 कोच महिला सेंकड क्लास रेल्व पास ) असे 21 एलएचबी तंत्रज्ञानाच्या डब्यांमुळे या प्रवाशांना मिळणाऱ्या सेवेच्या दर्जात आणि सुरक्षेत वाढ झाली आहे फ्लाईंग राणीचा वेग पूर्वी 110 किलोमीटर ताशी होता आता तो 130 किलोमीटर प्रतिताशी होणार आहे त्यामुळे गाडी सर्व स्टेशनवर वेळेत पोहोचणार आहे
एका प्रदीर्घ सेवेचा अंत !
16 जुलै 2023 च्या संध्याकाळपासून या ट्रेनला LHB-क्लास श्रेणीच्या सुधारित डब्यांसह अपग्रेड केले आहे, परंतु दुर्दैवाने ती आता डबल डेकर नाही. 18 डिसेंबर 1979 रोजी या ट्रेनमध्ये डबल डेकर डबे बसविण्यात आले होते, बरोबर 43 वर्षे सहा महिने 29 दिवस तिला आज झाले. आता पश्चिम रेल्वेवर आता वलसाड फास्ट पॅसेंजर ही एकच शेवटची नॉन-AC डबल डेकर ट्रेन पुरली आहे.
मासिक रेल्वे पास धारकांना प्रवेश
ही लोकप्रिय मुंबई ते सुरत फ्लाईंग एक्सप्रेस पहिल्यांदा 1906 ला सुरु झाली होती. नंतर ती मधल्या काळात बऱ्याच वेळा बंद झाली. साल 1950 पासून ती निरंतर सेवा देत आहे, 18 डिसेंबर 1979 रोजी ती देशाती पहिली डबलडेकर ट्रेन झाली. तिला मुंबई – पुणे डेक्कन क्वीनच्या धर्तीवर धावती डायनिंग कार होती, फ्लाईंग राणीतून पुन्हा पासधारकांना प्रवासकरता येणार आहे.
कोरोनाकाळात ही सेवा बंद केली होती. पालघर येथे या गाडीचे स्वागत शिवसेनेचे प्रवक्ते व डी आर यु सी सी सदस्य केदार काळे व इतर मान्यवरांनी केले गाडीतून प्रवास करणाऱ्या भारताच्या रेल्वे राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश व डी आर एम श्री निरज वर्मा यांचे स्वागत करण्यात आले .

मुंबई सेंट्रल विभागाचे डीआरएम श्री निरज वर्मा यांना पालघर रेल्वे स्थानकावरील समस्यांबाबत केदार काळे यांनी सविस्तर सांगितले प्लॅटफॉर्म नंबर दोन व तीन वरील लिफ्ट चे काम पावसाळ्यानंतर सुरू होईल असे श्री निरज वर्मा म्हणाले तसेच दिवाळीपूर्वी डब्याचे पोझिशन सांगणारे इलेक्ट्रॉनिक इंडिकेटर लावण्यात येतील असेही सांगितले तसेच पूर्व पश्चिम भागात जोडणारा रेल्वेचा फोटो ब्रिज लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन डी आर एम यांनी दिले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com