नवी मुंबई सायबर सेल/कक्ष१ व गुन्हे शाखा कक्ष-१पोलीसांकडुन इंटरनॅशनल काॅल रुटिंग करणारे बेकायदेशिर काॅल सेंटर उध्वस्त…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

नवी मुंबई: मंगळवार दिनांक २५ ऑक्टोबर 2022 रोजी मिळालेल्या माहितीनुसार भारतातील ब-याच राज्यातुन मुख्यत्वे केरळ, तामिळनाडू , पश्चिम बंगाल, कर्नाटका, दिल्ली, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र इ. राज्यातील नागरीकांचे परदेशात जसे बहरिन, युएसए, बांग्लादेश, अरबी देश इ. या देशात राहणारे त्यांचे नातेवाईक/मित्रपरिवार यांचेकडुन येणारे आंतरराष्ट्रिय फोन कॉल्स् हे त्यांचे परदेशीतील मोबाईल क्रमांकाने मोबाईलवर डिस्प्ले न होता त्याऐवजी त्यांना +912250171902, +912250171951,+912250172035 अशा प्रकारचे भारतीय स्थानिक क्रमांक भारतीय नागरीकांचे मोबाईलवर दिसुन येत असल्याच्या अनेक तकारी Department of Tele Communication ps DOT Toll Free Call Center No. 1800110420/1963 या क्रमांकावर प्राप्त झाल्या आहेत. सदरची तकार DOT कडुन नवी मुंबई पोलीसांना प्राप्त झाली. सदर तक्रारीचे अनुषंगाने श्री. अनिल गणपत हुले, वय ५२ वर्षे, व्यवसाय-नोकरी(कनिष्ठ दुरसंचार अधिकारी-सिक्युरीटी-२) रा.ठि- दुरसंचार विभाग, मुंबई यांचे तकारीवरून तुर्भे पोलीस ठाणे – गु.र.नं. २७१/२०२२,भा.दं.वि कलम ४२०,३४सह भारतीय टेलिग्राफ कायदा कलम ४,२०,२१,२५ गुन्हा दाखल करण्यात आला.
DOT कडुन प्राप्त तकारी व दाखल गुन्हयाचे अनुषंगाने वरिष्ठांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली सायबर सेल कक्षाचे प्रभारी अधिकारी विजय वाघमारे व कक्ष-१ चे प्रभारी अधिकारी सुनिल शिंदे यांचे अधिपत्याखाली संयुक्त तपास पथक तयार करण्यात आले.

M/s Global Enterprise ची प्राप्त केलेल्या तांत्रिक माहितीचे सुक्ष्म परिक्षण व तांत्रिक विश्लेषण केले असता यातील संशयीत M/s Global Enterprises हे BPO (Call Center) चे नावाखाली International illegal VoIP Call Routing (Grey Market operations) करत असल्याची तपासात निष्पन्न होवुन गुन्हयात सहभाग असलेले खालील नमुद चारही आरोपी हे मिरारोड, ठाणे, कांदिवली, बोरीवली परिसरातील असल्याने वर नमूद पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषण व तपासाचे आधारे एकाच वेळेस चारही आरोपी राहत असलेल्या ठिकाणी छापा टाकुन दिनांक २२/१०/२०२२ रोजी ०१:०१ वा. अटक करून मा.न्यायालयाकडून दिनांक २८/१०/२०२२ रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केले आहे.

आरोपीतांची गुन्हे कार्यप्रणाली
१. आरोपी हे स्थानिक कॉल सेंटर (BPO Call Center) चालविणार असल्याचे सांगुन जागा
मालकांना जादा भाडे देवुन भाडेकरारनामा करून घेतात.
२. भाडेकरारनाम्याचे आधारे गुमास्ता परवाना, UDYAM आधार व्यवसाय परवाना, GST परवाना,
कंपनीचे PANCards. कागदपत्रे तयार करून त्याआधारे बोगस कंपनीची स्थापना करतात.
३. बोगस कंपनीच्या तयार केलेल्या कागदपत्रांचे आधारे व अन्य व्यक्तिच्या नावाने अनेक सिमकार्ड व
अनेक मोबाईल फोन्स प्राप्त करतात. ४. बोगस/बनावट मोबाईल सिमकार्डचा वापर कंपनी रजिस्ट्रेशन, कंपनी संपर्क क्रमांक म्हणुन वापर
करतात.
५. बोगस कंपनीचे कागदपत्र व अन्य व्यक्तिंच्या नावाने प्राप्त केलेले मोबाईल क्रमांक या माहितीच्या
आधारे Local Mobile Service Provider यांचेकडुन SIP Trunk Line/PRI Lines (upto 1500) व Internet leased line Connectivity प्राप्त करतात.
६. त्यानंतर स्थानिक डाटा सेंटर येथील सर्व्हरची सेवा प्राप्त करून त्यामध्ये मोबाईल सर्व्हिस प्रोव्हाडर
यांचेकडुन प्राप्त केलेल्या SIP Trunk Lines/PRI Lines (upto 1500) व Internet leased line हे बोगस कंपनीच्या नावाने स्थापित केलेल्या सर्व्हरमध्ये जोडुन त्यामध्ये Astrick Software o Linux Operating System चा वापर करून Bogus Call Center Server कार्यान्वित
करतात.
७. डाटा सेंटर येथे कार्यान्वित केलेले Bogus Call Center Server pss IP Address (Intenet
Protocol) हे परदेशातील IP Address हे सोबत Configure करुन सदर जोडणीव्दारे International VOIP Call Traffic ही भारत सरकारच्या Department of Tele Communication ps International Legal Gateways By Doo G2 Bogus International VoIP Call
Routing व्दारे बेकायदेशिररित्या भारतात कॉल्स् पाठवुन भारत सरकारची फसवणुक करतात.

अटक केलेल्या आरोपीतांचे नाव व पत्ते:

१. सुरज मुरली वर्मा, वय-३० वर्षे, व्यवसाय- नोकरी, रा.ठि.- राजेंद्र नगर, देविपाडा, बोरिवली,
मुंबई
२. अनुप मुरली वर्मा, वय-४० वर्षे, व्यवसाय-इस्टेट एजंट, रा.ठि.रूतु इस्टेट, ब्रम्हांड, ठाणे
३. साजिद जलिल सर यद, वय-३६ वर्षे, व्यवसाय- इस्टेट एजंट, रा.ठि. नयानगर, मिरारोड (पुर्व),
ठाणे.
४. अब्दुल अजिज फिरोजाबादी, वय-४२ वर्षे, व्यवसाय-एजंट, रा.ठि. नयानगर, मिरारोड (पुर्व),ठाणे.

गुन्हयात हस्तगत केलेली मालमत्ता
(एकुण किंमत-रू.७,२६,000/- अंदाजे)
एक DELL कंपनीचा सर्व्हर Server Name-Vodafone Global Enterprise, Server Make-Dell रू.६२०एजु.वा.किं.सु.५,५०,000/ मोबाईल फोन्स-२२- किंमत अंदाजे रु.१,७६,000/Neo Spark Enterprise, Global Enterprise, DK Enterprice, SK Enterprises a Simplex term Solutions Enterprises या बोगस कंपनीचे नावाने तयार केलेले गमास्ता परवाना. UDYAM आधार व्यवसाय परवाना, GST परवाना कागदपत्र आधारकार्ड-४ पॅनकार्ड-४
ATM Card-३ cs Sctine स्टॅम्प पेपर व रबरी स्टॅम्प

उघडकीस आलेले गुन्हे

१. तुर्भे पोलीस ठाणे-गु.र.नं. २७१/२०२२,भा.दं.वि कलम ४२०,३४सह भारतीय टेलिग्राफ कायदा
कलम ४,२०,२१,२५
२. गोरखनाथ पोलीस ठाणे, जि. गोरखपुर, राज्य- उत्तरप्रदेश, गु.र.नं. ७१/२०२२,भा.दं.वि कलम
४१९, ४२०,५०६,३४
३. आरोपीतांनी अशाच प्रकारे हैद्राबाद येथील डाटा सेंटरमध्ये Bogus Call Center Server स्थापित
केले असुन याबाबत DOT व हैद्राबाद पोलीस यांना माहिती देण्यात आली आहे.

भारत सरकार/Department of Tele Communication ची झालेली आर्थिक फसवणुक

सदर International illegal VoIP Call Routing Bogus Call Center मुळे भारत सरकार/Department of Tele communication ची रु.२ कोटी ६२ लाख ७९ हजार ची आर्थिक फसवणुक झाली आहे.

सदरची कारवाई नवी मुंबई मा.पोलीस आयुक्त श्री बिपिन कुमार सिंग, मा.पोलीस सह आयुक्त श्री. डॉ.जय जाधव, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे,श्री. महेश घुर्ये, मा. पोलीस उपआयुक्त,गुन्हे श्री. सुरेश मेंगडे आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त,गुन्हे शाखा, श्री. विनायक वस्त यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

प्रत्यक्ष कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार

१. वपोनि श्री विजय वाघमारे, सायबर सेल, गुन्हे शाखा, नवी मुंबई २. वपोनि श्री. सुनिल शिंदे, गुन्हे शाखा कक्ष-१, नवी मुंबई
३. सायबर सेल कक्षाचे सपोनि/सागर गवसणे, सपोनिरी/विजय उपाळे, पोउनि/आकाश पाटील, पोउनि/देवकत्ते पोहवा/चौगुले, मपोशि/गडगे, पोना/मंगेश गायकवाड, पोना/कारखेले,
पोशि/निरज दाभाडे
४. गुन्हे शाखा कक्ष- १, चे सपोनि/हर्षल कदम, पोहवा/रोहिदास पाटील, पोना/केंद्रे,
पोना/जगदाळे, पोशि/जाधव, पोशि/सावरकर, पोशि/ठाकुर, पोशि/उत्तेश्वर जाधव, पोहवा/लिंगाळे

नवी मुंबई पोलीस आयुक्तलयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे International Calls प्राप्त होत असल्यास DOT Toll Free Call Center No. 1800110420/1963″ या क्रमांकावर तसेच सायबर सेल कक्षाशी तात्काळ संपर्क करावा.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट