१५० जणांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्यांना नवघर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

मीरा रोड :– परदेशात नोकीचे आमिष दाखवून १०० ते १५०जणांच लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई नवघर पोलिसांनी केली.

या आरोपींकडून ६ लाख २ हजार रुपये रक्कम तसेच १४९ पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत.

नवघर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. २५८/२०२४ भादंवि कलम ४१९, ४२०, ४०६, ३४ सह दि इमिग्रेशन अॅक्ट १९८३ चे कलम १०, २४ प्रमाणे गुन्हा नोंद होता. यातील फिर्यादी पवन नसीब सिंग (वय ३८ वर्षे धंदा जे.सी.बी ऑपरेटर. रा. रुम नं. १५९/ ए, व्हिलेज गाव बनवाल, जि. पठाणकोट, सुजानपुर, राज्य-पंजाब) यांना आरोपींनी इगलप्लेसमेंट सव्हींसचे, नसीब अपार्टमेंट, रुम नं १०३, जेसल पार्क, भाईंदर पूर्व येथील कंपनीद्वारे परदेशात नोकरीस लावण्याचे अमिष दाखवुन त्यांचा पासपोर्ट स्वतःकडे ठेवला. आरोपींकडे कोणताही नोकरीस लावण्याचा परवाना नसतांना परदेशात नोकरीस पाठवतो असे सांगुन फिर्यादीकडून ७९ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. अशाच प्रकारे १०० ते १५० तरुणांची आरोपींनी फसवणूक करुन रुपये १० लाख २० हजारांचा अपहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या गांभीर्य लक्षात घेऊन नवघरच्या गुन्हे प्रकटीकरपण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळाला भेट देवुन तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी अबरार अहमद मुक्तार शहा उर्फ अशपाक (वय-४६), वसिम ऊर्फ साहील यासिन शहा, मोहम्मद तारीक ऊर्फ फैजल कादरी अब्दुल गफार सिदिदकी यांची नावे समोर आली. पोलिसांनी या सर्वांना अटक केली. तपासदरम्यान आरोपींकडून फसवणूक केलेल्या रकमेपैकी ६ लाख २ हजार रुपये रक्कम तसेच १४९ पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, राजेंद्र मोकाशी सहाय्यक पोली आयुक्त यांचा मार्गदर्शनाखाली धिरज कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अशोक कांबळे, सपोनि संदिप पालवे, सपोनि/अमोल तळेकर, सपोनि विशाल धायगुडे, पोउपनि ज्ञानेश्वर आसबे, हवालदर भुषण पाटील, हवालदार संतोष पाटील, अंमलदार सुरेश चव्हाण, नवनाथ घुगे, ओंकार यादव, सुरजसिंग घुनावत, अस्वर, पवार, कारंडे, मगर, मसुबा जवान कुणाल हिवाळे यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट