नौपाडा पोलिस ठाण्या हद्दीत फिर्यादी झोपेत असतानाच चोरीस गेलेला माल पोलीसांकडून हस्तगत…

उपसंपादक – रणजित मस्के
नौपाडा : ठाणे:- दिनांक २०/०२/२०२३ रोजी फिर्यादी त्यांचे परीवारासह रहाते घरात दरवाजा बंद करून झोपले असतांना कोणीतरी अज्ञात चोरटा दरवाजा उघडून घरात प्रवेश करून फिर्यादी यांचे सुमारे १६,०००/- रू. किंमती चे ४ मोबाईल फोन चोरी करुन पळून गेला बाबत फिर्यादी यांचे तकारीवरून दिनांक २३/०२/२०२३ रोजी नौपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि.क. ६७ / २०२३, भादविसं कलम ३८०, ४५७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नमुद गुन्हयाचे घटनास्थळावरील प्राप्त सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ३. टीम तयार करून, घटनास्थळा पासून मुंब्रा पर्यंतचे सुमारे ३० ठिकाणाचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करून व तांत्रिक तपासाचे आधारे चोरी करणारा आरोपी मुंब्रा येथे असल्याची माहिती प्राप्त करून, सलग ३ दिवस मुंब्रा परीसरात आरोपीचा शोध घेवून, आरोपी अब्दुल समद नुरमोहम्मद सखानी वय २७ वर्षे स बी/१२, कंधारी बिल्डींग, कौसा, मुंब्रा, जि.ठाणे, यास शिताफीने पकडून त्याचे कडून गुन्हयातील चोरी केलेले ५ मोबाईल फोन, एक लॅपटॉप, दोन मोटारसायकल असा मुद्देमाल हस्तगत करून, नौपाडा पोलीस स्टेशनचे ४, कळवा पोलीस स्टेशन १ व ठाणेनगर पोलीस स्टेशन १ असे एकूण ६ गुन्हे उघड करण्यात आले आहेत.
हस्तगत-मुद्देमाल…
१) १,५०,०००/- रु. किंमतीचे ५ मोबाईल फोन
२) ५०,०००/-रु. किंतीची एक डेल कंपनीचा लॅपटॉप
३) ४७,०००/- रु. किंमतीची एक ज्युपीटर मोटारसायकल
४) २,१९,५००/- रु. किंमतीची एक बुलेट
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com