नाशिकरोड पोलीसानी तडीपार युवकाकडून गावठी कट्टा केला जप्त..

उपसंपादक – रणजित मस्के
नाशिकरोड :– सामनगावरोड अश्विनी कॉलनी परिसरात पकडलेल्या दुचाकीवर ट्रिपल सीट जाणाऱ्या युवकांपैकी एक युवक तडीपार करण्यात आलेला असून त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. सचिन बारी यांनी दिली.याबाबत त्यांनी सांगितले की, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शेळके व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी शुक्रवारी रात्री सामनगावरोड अश्विनी कॉलनी परिसरात सराईत गुन्हेगारांचा शोध घेत होते. यावेळी अस्वले मळ्याकडून अश्विनी कॉलनीच्या दिशेने दुचाकीवर संशयास्पदरीत्या येणाऱ्या तीन युवकांना पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता तिघे युवक पळून जाऊ लागले.

यावेळी दुचाकी स्लिप झाल्याने तिच्यावरील दोघे युवक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. तर खाली पडलेला मयूर जानराव (२१, रा. कैलासजी सोसायटी, जेलरोड) याला पकडण्यात आले.मयूर याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा मिळून आला.
तसेच त्याला दोन वर्षासाठी शहरातून हद्दपार करण्यात आल्याचे देखील तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी होंडा कंपनीची करिजमा दुचाकी (एमएच डीडब्ल्यू ३००८) जप्त केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com