नाशिकरोड पोलीसांनी सामनगावातील आरोपी रोशन गोधडे याच्याकडून चोरीच्या ३ दुचाकी केल्या जप्त…

उपसंपादक – रणजित मस्के
नाशिकरोड :- सामनगाव रोड अश्विनी कॉलनी येथील युवकाकडून नाशिकरोड पोलिसांनी विविध ठिकाणांहून चोरलेल्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. यामुळे आणखी दुचाकी चोरींची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
देवळाली गाव अण्णा भाऊ साठे नगर येथील दिलीप युवराज सपकाळे यांची दुचाकी (एमएच १५ बी एफ३३०६) तील पेट्रोल संपल्याने त्यांनी चार दिवसांपूर्वी जेलरोड पाण्याची टाकी मनपा शाळेजवळ आपली दुचाकी लावली होती. सपकाळ हे दुसऱ्या दिवशी दुचाकी घेण्यासाठी गेले असता त्यांना गाड़ी चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके, सहायक पोलिस निरीक्षक गणेश शेळके व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी दुचाकी चोरीचा तपास करत होते.

यावेळी हवालदार विष्णू गोसावी यांना सामनगाव रोड येथील अश्विनी कॉलनी येथे राहणारा युवक रोशन संजय गोधडे (२३) याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ रोशन गोधडे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने जेलरोड पाण्याची टाकी इथून हिरो होंडा सीडी डॉन ही दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com