गुंगीकारक औषध देवून लुटणारीमहीला व तीच्या ०४ साथीदारांची टोळी नाशिक गुन्हे शाखा युनिट १ ची बेधडक कारवाई…

उपसंपादक – रणजित मस्के
नाशिक शहर : म्हसरूळ पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे फिर्यादी नामे श्री. बापू किसन सुर्यवंशी रा. सावतानगर सिडको, नाशिक यांनी तक्रार दिली की, दिनांक १२/०५/२०२३ से जी २०.३० चे सुमारास एका अनोळखी महिलेने मला फोन करून सुरत येथे जायचे आहे असे सांगुन हॉटेल सायबाचे पुढे अमृततुल्य दुकाना समोर दिडोरीरोड, नाशिक येथे माझे कार मध्ये बसुन | वणी येथे सदर महिलेचा अनोळखी मित्र कार मध्ये बसवुन घेवुन मला देवीचा प्रसाद म्हणुन गुंगीचे औषध टाकलेला पैढा खायला दिला व त्यानंतर मी बेशुद्ध झालेनंतर माझी कार व अंगावरील सोन्याचे दागीने व पाकीट असा एकूण १,२१,०००/- रूपये किंमतीचा माल चोरून घेवून पळून गेले होते. यावरून म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १०२/२०२३.भा.द.वि. कलम ३२८, ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दिनांक १९/०५/२०२३ रोजी दाखल झाला होता.
गुन्हे शा. नि क. १ नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोलीस अधिकारी व अंमलदार सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना तांत्रिक माहिती व सि. सि. टी. व्ही. फुटेजच्या आधारे म्हसरूळ पोलीस स्टेशन ला दाखल गुन्हयात सहभागी असणारा आरोपी निलेश राजगीरे यास प्रथम निष्पन्न केला. त्याचा शोध त्यास दि. २२/०५/२०२३ रोजी ताब्यात घेवुन त्याचे कडे अधिक तपास करता सदर गुन्हयात मुख्य सहभाग असणारी महीला व मुख्य आरोपी दिनेश विजय तसेच त्यांचे साथीदार किरण वाघचौरे व मनोज पाटील यांनी सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपास करून आरोपी किरण वाघचौरे व मनोज पाटील यांना ताब्यात घेतले, त्यानंतर मुख्य आरोपी दिनेश विजय का वास सापळा रचुन दि. २२/०५/२०२३ रोजी जेलरोड भागातून स्विप्ट कार क. एम एच १९ बी यु ६५८५ सह ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचे सायास गुंगीकारक औषधे मिळुन आली, सदर आरोपी रिक्ट कार बाबत तपास करता मुख्य आरोपी दिनेश विजय कबाडे याने त्याची महीला साथीदार यांनी दि. २१/०५/२०२३ रोजी रात्री एका अनोळखी इसमास पुन्हा | गुंगीकारक औषध देवून त्याला लुटुन त्याची कार पळविल्याचे सांगीतले, त्यावरून महीला आरापीताचा शोध घेवून तीला दि. २३/०५/२०२३ रोजी सकाळी ताब्यात घेतले. तीचे कडे ही मुंगीकारक औषधे मिळुन आली सदर आरोपीना अटक करून दि. २३/०५/२०२३ रोजी मा. न्यायालया समोर हजर केले असता त्यांना दि. २६/०५/२०२३ रोजी पावेतो पोलीस कोटडी रिमांड दिली आहे. पोलीस कोठडी रिमांड दरम्यान सदर आरोपीतांकडे एकत्रीत अधिक तपास करता त्यांनी यापूर्वी अशा प्रकारे गुन्हे केल्याची कबुली दिली.
सदर टोळी पोलीस गुन्हयातील फिर्यादी यांची सियाज कार
क. एमएच ०४ एवं एक ७३९१ व लुटलेले २९ ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. याव्यतीरिक्त आडगाव पो. ठाणे वडील गुरनं १२२ / २०२३ भादवि कलम ३२८, ३७२ ३४ या गुन्हयातील १३. | ग्रॅम सोने, पडवाल व मोबाईल हस्तगत केले आहे. तसेच त्यांचेकडुन स्विप्ट कार क. एम एच १९ बी ६५८५ ब्रिझाकार बनावट क. एम एच १५ जी आर ५६३२ हस्तगत केल्या आहेत. असा एकुण १४.८६, ५००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीकडुन

१) म्हसरूळ पोलीस स्टेशन गु.र.वं. १०२ / २०२३ मा.वि. कलम ३२८. ३७९, ३४ प्रमाणे
२) आडगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. १२२ / २०२३ भा.द.वि. कलम ३२८.३७९.३४ प्रमाणे,
३) कासा पोलीस ठाणे, पालघर गु.र.नं. ५२ / २०२३.भा.द.वि. कलम ३२८,३९२, ३४ प्रमाणे
४) वाळुंज पोलीस ठाणे, औरंगाबाद। गु. २.नं. ६८ / २०२३ भादवि कलम ३७९, ३४ असे गुन्हे उघडकीस आलेले आहे. तसेच यातील मुख्य आरोपी दिनेश विजय कबाडे यांचे वर कनबा पोलीस ठाणे, अहमदाबाद राज्य गुजरात येथे गु २.नं. ५०३/२०२३ भा.द.वि. कलम ३०२ १२०३, ११४, ३४ प्रमाणे व किरण एकनाथ वाघचौरे याचे वर सिटी पोलीस ठाणे, श्रीरामपुर येथे गु.र.नं. ११२०/२०२२ भा.द.वि. कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हे दाखल आहे. वर नमुद आरोपीतांकडुन अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हेशाखा युनिट ०१ वे पोलीस उप निरीक्षक श्री. चतन श्रीवंत हे करीत आहे.

सदर कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो, मा. पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव सो. हे मा.सहा. पोलीस आयुक्त वसंत मोरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय माल पोनिक हेमंत तोडकर, पो.उप.निटी, चेतन श्रीमंत, सपीजन रविंद्र बागुल, पो. हवा. प्रविण धमारे नाझी पठाण, धनंजय शिवो, विशाल देवरे, विशाल काठे, महेश साळुंके, आप्पासाहेब गुरुतर शेख, सुरेश को योगीराज गायकवाड, मनोज डोंगरे, रावजी जगर, चालक सपोजन / किरण शिरसाठ, पो.अ./ समाधान पवार यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com