नाशिक शहर उपनगर पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा शांतीरक्षक कल्याण संस्थेतर्फे विशेष सन्मान..

नाशिक :
उप संपादक- उमेद सुतार


नाशिक, पोलीस दलामध्ये महिला पोलीस कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. चूल मूल सांभाळत त्यांना पोलीस कर्तव्यही पार पाडावे लागते. यामुळे त्यांना तारेवरची कसरत करत जीवन जगावे लागत असतानाही अनेक महिला पोलीस कर्मचारी यशस्वीरित्या हा सर्व कारभार सांभाळत आहेत. या सर्व जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असलेल्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे म्हणजे तो आपल्याला मोठा मान आहे असे संस्थापक अध्यक्ष उमेद सुथार यांनी यावेळी सांगितले.
जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना शान्तीरक्षक कल्याण संस्थान पोलीस मित्र यांनीही नाशिक शहर उपनगर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेन्द्र सपकाळ ,शान्तीरक्षक कल्याण संस्थानचे पोलीस मित्र संस्थापक उमेदभाऊ सुथार ,नाशिक जिल्हा विल्सन साळवी,नाशिक जिल्हा महिला अध्यक्षा संगीता शिंदे,नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ज्योती भोसले,नाशिक जिल्हा सचिव सुनीता जाधव, महिला आघाडी ,मंजुषा पवार,आरती गायके,शर्मिला जाधव,आशा डांगे,मनोहर गायकवाड उपस्थित होते.