लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास 10 वर्षे सश्रम कारावासाची व 4000/- रूपये द्रव्य दंडाची शिक्षा..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- मा. जिल्हा व सत्र न्यायाधिश, न्यायालय-2 गोंदिया, मा. श्री. नितीन डी. खोसे, यांनी दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी लैंगिक शारीरिक अत्याचार प्रकरणाचा न्यायनिवाडा करून अल्पवयीन 6 वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी लैंगिक अत्याचार करणारा नराधम आरोपी नामे – 1) विक्रम उर्फ सन्नी देविसींग ठाकुर, वय 23 वर्ष, राहणार- नंगपुरा मुर्री गोंदिया, यास 10 वर्षे सश्रम कारावासाची आणि 4 हजार रू. द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावली आहे…

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी नामे- विक्रम उर्फ सन्नी देविसींग ठाकुर, रा. नंगपुरा मुरीं गोंदिया यांनी सन 2016 मध्ये श्रीनगर गोंदिया येथील महिला तक्रारदार यांचे गैरहजेरीमध्ये फिर्यादीचे अल्पवयीन 6 वर्षाच्या मुलीवर तिचे नासमजपणाचा फायदा घेवुन शारिरीक अतिप्रसंग केल्याने तक्रारीवरुन पो. ठाणे गोंदिया शहर येथे अप.क्रमांक-242/2016 कलम 376 (2), (आय), (एन), भा.द.वि. सहकलम 4, 6 बाल लैंगीक अत्याचार प्रतीबंधक कायदा 2012 अन्वये गुन्हा नोंद करुन गुन्ह्याचे तपासाअंती आरोपी विरुध्द मा. जिल्हा व सत्र न्यायाधिश-02 न्यायालय गोंदिया येथे गुन्ह्याचे दोषारोपपत्र सादर करुन फौजदारी स्पेशल खटला क्रमांक- 11/2017 प्रमाणे चालविण्यात आला.

सदर खटल्याचे सुनावणीत आरोपीविरूध्द सबळ साक्षपुराव्यावरून दोषसिध्द झाल्याने दिनांक – 21/02/2024 रोजी मा. न्यायालयाने आरोपी यास 10 वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी 4000/- रू. द्रव्यदंडाची शिक्षा, तसेच दंड न भरल्यास 3 महिण्याचा अतिरीक्त कारावासाची शिक्षा ठोठावलीआली आहे…

नमूद शिक्षा झालेल्या गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक- मिलींद नवगिरे, यांनी केला आहे… सदर गुन्ह्याचे खटल्याचे न्यायालयीन युक्तीवाद सरकारी अभियोक्ता श्री. महेश चांदवानी यांनी केले आहे. तसेच न्यायालयीन कामकाज मपोहवा. टोमेश्वरी पटले यांनी केले आहे..

सदर गुन्ह्याचे उत्कृष्ट तपासाबाबत तपास करणारे आणि तपास व न्यायालयीन प्रक्रियेत मदत करणारे सर्वांचे पोलीस अधिक्षक, गोंदिया, मा. श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा अतीरिक्त कार्यभार उपविभाग गोंदिया, श्री. प्रमोद मडामे, आणि पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे प्रभारी सहा. पोलीस निरिक्षक श्री. सोमनाथ कदम यांनी अभिनंदन आणि कौतुक केलेआहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट