नंदूरबार जिल्हा झाला अमली पदार्थ मुक्त!महाराष्ट्रातील ठरला पहिला जिल्हा; विद्यार्थ्यांसह शेकडो जणांनी घेतली प्रतिज्ञा…!

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नंदूरबार:

नंदूरबार जिल्हा अमली पदार्थ मुक्त घोषित झाला असून अमली पदार्थ मुक्त घोषित होणारा हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी नंदूरबार येथे ही घोषणा केली. त्या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यासह शेकडो जणांना या संदर्भाने प्रतिज्ञा देण्यात आली.

नंदूरबार जिल्हा पोलीस दलाने मागील वर्षी अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये केलेल्या कारवाया पाहून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस
महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी अमली पदार्थ मुक्त जिल्हा होऊ शकेल, अशी सूचना मांडली होती.

त्या अनुषंगाने अमली पदार्थ विरोधी कारवाया करण्याबाबत नंदूरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ मुक्त जिल्हा या मोहिमेचा शुभारंभ एक मार्चपासून करण्यात आला. नंदूरबार जिल्ह्यात जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अमली पदार्थांची
शेती, अमली पदार्थ बाळगणे, त्याची वाहतूक करणे, त्याची विक्री करणे यावर यापूर्वीच प्रतिबंध करण्यात आला आहे. अमली पदार्थ विरोधी कायद्याचे पालन न करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध छापा कारवाई करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

यासंदर्भात बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी सांगितले की, अमली पदार्थ मुक्त जिल्हा हा उपक्रम यशस्वी व्हावा त्याची माहिती जिल्हा घटकातील तळागळापर्यंत व्हावी याकरिता पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील गाव पातळीवर पोलीस पाटील, गावातील नागरिक तसेच शाळा महाविद्यालय येथे आजपावेतो एकूण २०६ बैठका घेण्यात आल्या आहेत. उपक्रमाबाबत जनजागृती व्हावी याकरिता पोस्टर्स व बॅनर्स यांचे मदतीने जनजागृती करण्यात येत आहे. अमली पदार्थ याबाबत गोपनीय माहिती पोलीस दलास व्हावी याकरिता ९०२२४५५४१४ हा हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून त्यावर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची संबंधित पोलीस ठाण्यांकडून तातडीने दखल घेवून कारवाई करण्यात येते. तसेच तक्रारदार यांची माहिती गोपनीय ठेवली जाते, असेही जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट