नांदेडसिटी पोलीसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडुन चोरी केलेल्या २ दुचाकी केल्या जप्त..

पुणे

सह संपादक -रणजित मस्के
नांदेडसिटी पोलीस स्टेशन हद्दीत होणा-या वाहनचोरी गुन्ह्याचे अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नांदेडसिटी पो.स्टे श्री. अतुल भोस, यांनी विशेष मोहिम राबवली त्यामध्ये नांदेडसिटी पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राहुल यादव व पोलीस अंमलदार यांना वाहन चोरी केलेल्या आरोपींचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश देण्यात आलेले होते. त्यानुसार तपास पथाकातील पोलीस अंमलदार मोहन मिसाळ, शिवा क्षीससागर यांना त्यांच्या गोपणीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी नामे ओकांर सातपुते रा. धायरी पुणे व साईराज तावरे रा. धायरी पुणे यांचेकडे चोरीच्या मोटार सायकल असल्याबाबत माहीती मिळाली. त्या अनुषंगाने आरोपी नामे १) ओकांर संतोष सातपुते वय २० वर्षे, रा. लागयुडे वस्ती धायरी पुणे व २) साईराज अतुल तावरे वय १८ वर्षे, रा. कांबळेवस्ती गणेशनगर, धायरी पुणे यांचा धायरी परिसरात शोध घेवुन सापळा रचुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास करता त्यांनी संगणमताने १) नांदेडसिटी पो.स्टे १. गु.र.नं. ११९/२०२५, बीएनएसकलम ३०३ (२) व २) गु.र.नं. १२१/२०२५, बीएनएसकलम ३०३ (२) या गुन्ह्यातील वाहने चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. नमुद गुन्ह्यात चोरीस गेलेले १) कि.रु. १०,०००/- ची एक हिरो स्प्लेन्डर मोटार सायकल क्र. एम.एच. १२ एफ.क्यु ८३८७ व २) कि.रु. १५,०००/- ची हिरो स्प्लेन्डर मोटार सायकल क्र. एम.एच.१२ एफ.क्यु. ७३५५ या जप्त करण्यात आलेल्या आहेत.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ पुणे, श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग पुणे श्री अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली नांदेडसिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोस, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. गुरुदत्त मोरे, सहा. पोलीस निरीक्षक राहुल यादव, पोलीस अंमलदार मोहन मिसाळ, शिवा क्षीससागर, राजु वेंगरे, उत्तम शिंदे, स्वप्नील मगर, निलेख कुलथे, भिमराज गागुर्डे, प्रतिक मोरे, अक्षय जाधव, संग्राम शिनगारे, सुदाम वावरे, सतिश खोत यांच्या पथकाने केली आहे.