नांदेड सिटी पोलीस ठाणे कार्यान्वित; कंट्रोल रुमला कॉल देऊन प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात…!

उपसंपादक-उमेद सुतार

पुणे :- . पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत नांदेड सिटी येथील पोलीस स्टेशनचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते पार पडल्यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक विजया खुटवड यांच्या हस्ते प्रत्यक्षात फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
सहायक पोलीस आयुक्त अजय परमार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर यांनी मनाचा मोठेपणा दाखवत महिला अधिकारी विजया खुटवड यांना हा मान दिला. यावेळी पोलीस निरीक्षक अतुल भोस, राहुल पोकळे, भरत कुंभारकर शिवाजी मते, रमेश करंजावणे, महेश पोकळे,अविनाश लगड, यशवंत लायगुडे, सौरभ मते, सुरेखा दमिष्टे, सचिन निवंगुने, कल्याणराव अवताडे पत्रकार, रमेश घुले, नरेंद्र हगवणे, विजय मते, नांदेड सिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज शर्मा, पोलीस अधिकारी व धायरी, खडकवासला, किरकटवाडी, नांदेड, नांदोशी सणसनगर या गावांतील विविध पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर आज शुक्रवारी नांदेड सिटी येथील पोलीस ठाणे सुरू झाले आहे. या पोलिस ठाण्याअंतर्गत सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यातील धायरी व हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदेड, किरकटवाडी, खडकवासला नांदोशी-सणसनगर या गावांचा समावेश करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या नांदेड सिटी गेटजवळ हे नवीन पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे. सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांनी पहिली नोंद घेऊन व परंपरेनुसार कंट्रोल रुमला कॉल देऊन प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com