नमो नमो मोर्चा भारत मार्फत महाड तालुक्यातील बिरवाडी येथे श्रमिक कार्ड कॅम्पचे आयोजन


महाड प्रतिनिधि -श्री.किशोर कीर्वे
दि.11 नोव्हेंबर 2021 पासून श्री.योगेश झांजे यांच्या प्रिंटींग प्रेस बिरवाडी मध्ये हा कॅम्प सुरू करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख आयोजक-नमो नमो मोर्चा भारत च्या राष्ट्रीय महिला प्रमुख समन्वयक सौ.मिनलताई बुटाला भाजप महाड तालुका अध्यक्षा सौ.रश्मीताई वाजे नमो नमो मोर्चा भारत च्या महाड तालुका अध्यक्षा सौ.सपनाताई शेठ उपाध्यक्षा सौ.मंजुताई जोशी तसेच भाजपा महाड तालुका उपाध्यक्ष श्री.प्रभाकर झांजे उपस्थित होते यावेळी मिनलताई बुटाला यांनी उपस्थितांना इ श्रमिक कार्डचे महत्त्व पटवून दिले आणि हा कॅम्प प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये घेण्याचा मानस आहे यासाठी नमो नमो मोर्चा भारत च्या सर्व सदस्यांनी पाठींबा दर्शविला आहे असे मिनलताई बुटाला यांनी सांगितले तसेच योगेश झांजे यांना नमो नमो मोर्चा भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.विजय ची हटवार तसेच प्रदेशाध्यक्ष श्री.अजयजी विरकर यांनी शुभेच्छा दिल्यात.

सदर इ श्रमिक कार्ड चे फायदे हे या कार्डमुळे असंघटित कामगारांना सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळेल. सरकार असंघटित कामगारांच्या कार्यशक्ती चा मागोवा घेऊन त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगार उपलब्ध करून देईल. हे कार्ड केल्यानंतर कार्ड धारकाला एक लाखाचा मोफत विमा एक वर्षासाठी मिळेल. या कार्डमुळे असंघटित कामगारांना बऱ्याच योजनांचा लाभ होणार आहे.

हे कार्ड कोणाला मिळू शकते तर हे कार्ड शेतकरी, घर काम करणाऱ्या महिला, मजदूरी करणारे कामगार ,भाजीविक्रेते ,फळविक्रेते ,दुकानांमधे काम करणारे कामगार, रिक्षा चालक, नाभिक ब्युटी पार्लर चालवणार्या महिला , हात गाडी चालवणारे इत्यादी कामगारास मिळु शकेल.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001