“नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट मुंबई टर्मिनल” नामांतर झालेच पाहिजे!

मुख्य संपादिका- दिप्ती भोगल
मुंबई :
मुंबईचे शिल्पकार व भारतीय रेल्वेचे जनक तमाम दैवज्ञ समाजाचे आराध्य दैवत आदरणीय, नामदार जग्गनाथ तथा नाना शंकरशेट यांचे नाव टर्मिनल रेल्वे स्थानकास देण्याचा ठराव राज्य सरकारने मंजूर केला आहे परंतु त्याची अमंलबजावणी १६ एप्रिल २०२५ रोजी करण्यात यावी यासाठी नामदार नाना शंकरशेट स्मारक समिती व स्थानिक दैवज्ञ समाज संस्था पदाधिकारी व ज्ञाती बांधवांनी उपरोक्त विषय संदर्भात भाजपचे बोरिवली विधानसभा क्षेत्राचे क्रियाशील आमदार सन्माननीय, संजयजी उपाध्यायसाहेब यांच्यासोबत प्रतिष्ठानचे सरचिटणीस माननीय, अॕड. मनमोहन चोणकरसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक चर्चा झाली सुसंवाद घडला व आमदारसाहेबांनी टर्मिनल नामांतर विषयी वैयक्तिक लक्ष घालून संबधितांशी चर्चा घडवून आणणे व हा विषय मार्गी लावण्यासाठी सर्वोत्परी सहकार्य करण्याचे समाज शिष्टमंडळास जाहीर आश्वस्थ केले…






बुधवार दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे प्रातिनिधीक स्वरुपात “नामदार जगन्नाथ तथा तथा नाना शंकरशेट टर्मिनल” या नावे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नामांतर झालेच पाहिजे.
तसेच स्मारकासाठी मंजूर झालेला निधी संदर्भात मा. मुख्यमंत्री श्री. देवेंदजी फडणवीससाहेब यांची भेट मिळवून देणार आहेत…
त्याच बरोबर विधानसभेत आणि प्रांगणात नानांचे तैलचित्र लावण्यात यावे.
मा. मुख्यमंत्र्यांनी ३१ जुलै पुण्यतिथी दिवशी अभिवादन करावे…
त्यासाठीचे निवेदन पत्रव्यवहार सोबत दिले.
यासाठी नामदार नाना शंकरशेट प्रतिष्ठान व समाज बांधवातर्फे या विषयी सरकार दरबारी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन छेडण्यात येणार आहे..!
त्यास आमदारांनी सदिच्छा भेट द्यावी हे ही आवाहन केले…
तसेच समस्त ज्ञाती बांधव व समाज संस्थांनी उस्तुर्फपणे या गंभीर विषयाबाबत जागरूक होऊन या नामांतर आंदोलनात बहुसंख्येने सहभागी व्हावे! असे जाहीर आहवान नामदार नाना शंकरशेट स्मारक प्रतिष्ठानतर्फे अॕड. चोणकरसाहेब यांच्यातर्फे समस्त समाज बांधवाना करण्यात आले आहे…
या प्रसंगी सर्व उपस्थित बांधवांना आमदार साहेंबातर्फे अल्पोपहार व चहापानाची व्यवस्था करण्यात आली हे विशेष नमूद केलेच पाहिजे..!
या शिष्टमंडळात जेष्ठ समाजसेवक अॕड. सच्चिदानंद हाटकर, राजन चाचड, जेष्ठ छायाचित्रकारः जयंत पेडणेकर यांच्यासह स्थानिक बोरिवली दैवज्ञ सोनार समाज अध्यक्षः राजेंद्र वैवडे, उपाध्यक्षः वासुदेव नार्वेकर, सरचिटणीसः श्वेताताई पावसकर,कार्यकारी सदस्याः स्नेहाताई चौडणकर, प्रसाद लवेकर, पद्माकर मदन, दीवाकर व मनोहर मानकामे बंधू, संदेश चौडणकर, व दैवज्ञ ब्राम्हण समाज, दहिसर अध्यक्षः लक्ष्मीकांत भडेकर, माजी अध्यक्षः प्रभाकर म्हशिळकर, चिटणीसः नम्रताताई खेडेकर, गजानन खेडेकर, मनोज आचरेकर आणि गोमंतक दैवज्ञ ब्राम्हण समाज उत्कर्ष संस्था (उपनगर मुंबई ) चे सर्वेसर्वाः श्री. हनुर्मेष रिवणकर, प्रदीप रायकर, कोकण कट्टा ( विलेपार्ले ) चे श्री. अजित पितळे, दीपेश सावंत तसेच स्थानिक संस्थाचे पदाधिकारी, सभासद ज्ञाती बांधवासह बहुसंख्येने सहभागी होते.