नामांकीत शिक्षण संस्था चालकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणा-या गुन्हेगारास ०५ तासांचे आत सिंहगड रोड पोलीसां कडून अटक

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे

सिंहगड रोड पोलीस ठाणे हद्दीमधील नामांकीत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांना त्यांचे मुलाचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची वेळोवेळी धमकी देऊन त्यांचेकडून २५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या नमुद शिक्षण संस्थेमधील माजी कॅमेरा व संगणक तज्ञ तथा आरोपी सुदर्शन कांबळे याचे विरुद्ध तक्रारदार यांनी दिनांक २०/०३/२०२५ रोजी तक्रार दिल्याने सिंहगड रोड पोलीस ठाणे, पुणे शहर, येथे गुन्हा रजि नं.१५५/२०२५, भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०८(२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दाखल गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. दिलीप दाईंगडे यांनी तात्त्काळ आरोपीचा शोध घेवुन ताब्यात घेणे बाबत चौकी अधिकारी तसेच तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या.

मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे प्रभावी मार्गदर्शनाखाली नमुद आरोपीबाबत केवळ जुजबी माहिती प्राप्त असताना, गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करुन, केवळ ०५ तासांचे आत आरोपीस त्याचे धायरेश्वर मंदीराजवळील घराजवळून ताब्यात घेऊन त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली.

सदरची कामगिरी मा. सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहरश्री. अजय परमार, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड पो.स्टे.चे श्री.दिलीप दाईगडे. पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. उत्तम भजनावळे, सपोनिरी समीर चव्हाण, पोउपनिरी सुरेश जायभाय, संतोष भांडवलकर, सागर पवार, पोलीस अंमलदार तारु, केकाण, शिंदे, बांदल, मोहिते, पांडोळे, पाटील, भोरडे यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट