नाल्यातून वाहणाऱ्या बाळाला वाचवणाऱ्या पोलिसांच्या निर्भया पथकावर कौतुकांचा वर्षांव.

मांजरीने निभवली महत्त्वपूर्ण भुमिका
मुंबई:घाटकोपर, पंतनगर, येथील नाल्यातील परिसरातील ही घटना घडली आहे. मुंबई पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
पंतनगर येथिल नाल्यातून एक नवजात बाळ वाहत असल्याचे प्रथम एका मांजराला दिसून आले. त्यामुळे या मांजराने जोर-जोरात ओरडण्यास सुरुवात केली. हे मांजर जोर-जोरात का ओरडत आहे हे बघण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली व गर्दी केली असता त्यांना नाल्यात नवजात बाळ वाहून जात असल्याचे लक्षात आले. मांजराने अलर्ट केल्यामुळे नागरिकांना बाळ वाहत जाताना दिसून आले.मग तेथील जमा नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांनी ही माहिती पुरवली . ही माहिती मिळताच मुंबईतील पंतनगर पोलिसांच्या निर्भया पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व त्या बालकास सुखरुप वाचविले व रुग्णालयात दाखल केले.
त्या नवजात अर्भकाला कपड्यामध्ये गुंडाळण्यात आले होते. त्याला बघून मांजरीने आवाज करायला सुरुवात केली.यानंतर लोकांचे लक्ष त्या नवजात अर्भकाकडे गेले. पोलीस पथकाने त्या बाळाला नाल्यातून बाहेर काढले आणि जवळील राजावाडी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, आता नवजात अर्भक धोक्याबाहेर असून प्रकृती उत्तम आहे.पुढील तपास घाटकोपर येथील पंतनगर पोलीस करत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com