घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीना अटक करुन मुद्देमाल हस्तगत करण्यात नालासोपारा पोलीसांना यश…

उपसंपादक-रणजित मस्के
नालासोपारा :- दिनांक १७/०८/२०२४ रोजी रात्री ११.०० वाजता ते दिनांक १८/०८/२०२४ रोजी पहाटे ०५:०० वाजताचे दरम्यान रूम नं. ची/१०३, शिवम बिल्डिंग, मैत्री पार्क, हनुमाननगर, नालासापोरा पश्चिम, ता. वसई, जि. पालघर येथे यातील आरोपीत बाने फिर्यादी यांच्या घराची बंद स्लायडींग खिडकी सरकवून घरात प्रवेश करून घरात चार्जिगला ठेवलेले फिर्यादी, फिर्यादीची पत्नी व भाऊ यांचे ४५,०००/- रुपये किंमतीचे ओपो कंपनीचे दोन मोबाईल, एक विवो कंपनीचा मोबाईल फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीचे इरादयाने स्वतःचे फायदयासाठी घरफोडी चोरी करुन नेले आहेत, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन नालासोपारा पोलीस ठाणेस गु.र.क्र. १ २९७/२०२४, भा.न्या.सं. कलम ३०५ (अ), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
नालासोपारा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून घरफोडी चोरींचे प्रमाण वाढल्याने त्याचाबत वेगवेगळे स्वंतत्र गुन्हे दाखल झाल्याने परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा तपास सुरु केला. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहीतीनुसार नमुद गुन्हयातील आरोपीत नामे मोहम्मद इजहार मोहम्मद अस्लम शेख, वय २३ वर्षे, रा.रु.नं.बी/३११, सफल चिल्डींग, समर्थ नगर, हनुमान नगर, नालासोपारा पश्चिम बास हनुमाननगर परीसरातून ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने विचारपूस करता, त्याने सदर गुन्हयाची कबूली दिल्याने त्यास दिनांक १८/०८/२०२४ रोजी १९.१८ वाजता अटक केली आहे. आरोपीत याचे घरझडतीत नमुद गुन्हयातील ४५,०००/- रुपये किमतीचे तिन्ही मोबाईल असा सर्व मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
तसेच अटक आरोपीत यांचेकडे केलेल्या तपासादरम्यान त्याने नमुद गुन्हयाव्यतिरीक्त आणखी दोन गुन्हे केले असल्याची कबूली दिल्याने त्याचेकडून नमूद गुन्हयातील सर्व रक्कम रूपये ३१,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अशाप्रकारे नमुद आरोपीताकडून ०३ गुन्हयातून एकूण रक्कम रूपये ७६,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीत नामे मोहम्मद इजहार मोहम्मद अस्लम शेख, वय २३ वर्षे, रा.रु.नं.ची/३११, सफल बिल्डींग, समर्थ नगर, हनुमान नगर, नालासोपारा पश्चिम वाचेकडून उघड झालेल्या परफोडी गुन्हयाची माहिती खालीलप्रमाणे
गुन्हा रजिस्टर क्रमांक व कलम
१. नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १ २९७/२०२४, भा.न्या.सं. कलम ३०५ (अ), ३३१ (४) अन्वये
२. नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. २९८/२०२४, भा.न्या.सं. कलम ३०५ (अ), ३३१ (४) अन्वये
३. नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १ २९९/२०२४, भा.न्या.सं. कलम ३०५ (अ), ३३१ (४) अन्वये
अटक आरोपीत हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर दाखल गुन्हयांचा पूर्वअभिलेख खालील प्रमाणे.
गुन्हा रजिस्टर क्रमांक व कलम
नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १ ४३३/२०२०, भादंविसंक ४५७,३८०,५११ अन्वये
नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ३०३/२०२०, भादंविसंक ३८० अन्वये
नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १ ३१५/२०२०, भादंविसंक ४५४,४५७,३८० अन्वये
नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १ ३८८/२०२३, भादंविसंक, ४५७,३८०,३४ अन्वये
वर नमूद गुन्हयाचा तपास स. फौ. हिरालाल निकुम, पो.हवा./किशोर धनू व पो.ना./अमोल तटकरे नालासोपारा पोलिस ठाणे मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय हे करित आहेत.
सदरची कामगिरी श्री. मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, श्री. जयंत बजचळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०३, राजेंद्र लगारे, सहायक पोलीस आयुक्त नालासोपारा यांचे मार्गदर्शनाखाली विजयसिंह बागल, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे, सपोनि/राजेंद्र चंदनकर, पो.उपनिरी. योगेश मोरे, सफी/हिरालाल निकुंभ, पोहवा / किशोर धनु, प्रशांत साळुंके, पोना/अमोल तटकरे, पो.अं./ राजेश नाटुलकर, बाबासाहेब बनसोडे, प्रताप शिंदे यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com