पती व सासरच्या जाचाला कंटाळून स्वत: मित्रासोबत बेपत्ता झालेली महिला नाईलाजास्तव अखेर पोलीस ठाण्यात दाखल…

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड:– आपला पती रोज दारु पिऊन मारहाण करीत असे व रोज संशय घेत असल्यामुळे सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून मी स्वतःच माझ्या मित्रासोबत गेली असल्याचे श्रीमती ज्योती रुपेश साळुंखे हिने महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्वतःच हजर राहून गुरुवार दिनांक २८ मार्च रोजी दिलेल्या जबाबात बेपत्ता झालेल्या ज्योती साळुंखे हिने सांगितले आहे.
महाड मध्ये दवाखान्यात आपल्या वडीलांना घेऊन जाते आणि तिथुन मी माझ्या सासरी पडवे येथे जाते असे सांगुन गेलेली ज्योती साळुंखे ही आपल्या माहेरी पंदेरी येथेही न गेल्याने मिसिंगची केस दाखल करण्यात आली होती.
या घटनेचा अधिक तपास मा.सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. माने यांच्या मार्गदर्शनाखाली करत असलेल्या पोलीस हवालदार श्री. जाधव यांनी आता तपास बंद केला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com