नायगांव नवकार सिटी येथुन चरस विक्री करणाऱ्या नेपाळी व त्याचा साथीदार यांना ताब्यात घेण्यास खंडणी विरोधी पथक यांना यश…

0
WhatsApp Image 2025-07-16 at 11.04.47 AM
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

नायगाव ( पुर्व )

वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे अनुषंगाने आयुक्तालयातील अंमली पदार्थ विक्री व सेवन रोखण्याकरीता खंडणी विरोधी पथक प्रभारी श्री राहुल राख यांनी यासंदर्भात माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार माहिती घेत असताना सपोनि विजयेंद्र आंबवडे यांना दिनांक १४.०७.२०२५ रोजी नायगांव पुर्व नवकार सिटी फेज-२ येथे दोन इसम चरस विक्रीकरण्याकरीता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. मिळालेल्या बातमीची शहनिशा करणे व मिळून आल्यास कारवाई करणे याकरीता मा. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेचे अधिकारी/अंमलदार यांनी सापळा रचून नायगांव पूर्व नवकार सिटी फेज-२ झिशान स्टार आर्केड या ठिकाणी इसम नामे १) प्रकाश श्रीकांत थापा, वय ४६ वर्षे, रा. रा. डी/२०४, बिल्डींग नं.०२, नवकार सिटी, फेज २, नायगांव पुर्व ता. वसई, जि. पालघर, २) मोहम्मद वाहीद शमीम शेख, वय २७ वर्षे, रा. सोमेश्वर नगर चाळ रुम नं.०५, अलहाफीज कपाऊंन्ड, नायगांव पुर्व ता. वसई, जि. पालघर यांना ताब्यात घेतले.

ताब्यातील इसमांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता इसम नाने प्रकाश श्रीकांत थापा याने स्वतःचे कब्जात ९११ ग्रॅम वजनाचा ३६,४४,०००/-रु, किंमतीचा चरस, मोचाईल फोन व इतर मुद्देमाल असा ३६,८८,४९५/- रुपये किमतीचा व त्याचा साथीदार नाने मोहम्मद वाहीद शमीम शेख याचेकडे मोबाईल एकूण १५,०००/- रुपये किंमतीचा असा एकूण किंमत ३७,०३,९४५/ रुपयेचा मुद्देमाल मिळून आला असून तसा तो सविस्तर पंचनामा करुन ताब्यात घेण्यात आला आहे. सदरबाबत नायगांव पोलीस ठाणे गुरनं ३५५/२०२५ एनडीपीएस कलम ८ (क), २० (च) ६६ (ब) प्रमाणे नमुद आरोपींचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून ताव्यातील इसम नामे प्रकाश श्रीकांत थापा, मोहम्मद वाहीद शमीम शेख यास जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईकरीता नायगांव पोलीस ठाणे यांचेकडे सुर्पूद करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. निकेत कौशीक, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. दत्तात्रय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, सपोनि/विलास कुटे, सपोनि / विजयेंद्र आंबवडे, पोउनि/ऑकार कोवे, सपोउनि, शकील पठाण, पोहया, पोहया, राजवीर संधु, पोहवा, राजाराम काळे, पोहया, सतिष जगताप, पोहवा. सुनिल गोमासे, पोहवा, शरद पाटील, पोहवा. अनिल नागरे, पोहवा. अकिल सुतार, पोअं. साकेत माघाडे यांनी यशस्वी कामगिरी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट