नायगाव गुन्हे शाखा पोलीसांनी एम.डी. विकणाऱ्या आरोपीला केले जेलबंद..

उपसंपादक- रणजित मस्के
वसई:– एमडी बाळगणाऱ्याला मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या नायगाव गुन्हे प्रकटीकरण पथकाने जेरबंद केले. या कारवाईत ५० हजारांचे एमडी जप्त करण्यात आले.
नायगाव पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश केकान यांना नायगाव पूर्व टिवरी गाव नयकार बिल्डींग नं ०३ समोरील चाळीजवळ एक इसम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्रीकरीता येणार असल्याची माहिती खबऱ्याने दिली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंगेश अधारे व गुन्हे प्रकटिकरणचे अधिकारी व अंमलदारांनी वसईतील नवकार बिल्डींग नं ०३ येथील चाळीसमोरील परिसरात सापळा लावला.
त्यावेळी स्कुटरवरून एक इसम त्या ठिकाणी आला असता पोलिसांनी त्याला स्कुटरसह ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने स्वत:चे नाव शानू वसीम कुरेशी (२८ वर्षे, व्यवसाय-बेकार राहणार रुम नं १०१/एविंग, बिल्डींग नंबर ०१, मरीमनगर, नायगाव पश्चिम, ता.वसई जि. पालघर) असे सांगितले. त्याच्या स्कुटरची झडती घेतली असता डिक्कीत प्लास्टीकच्या पिशवीत ५० हजार रुपयांचे मेफेड्रॉन (एम.डी.) आढळले. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात (गु.रजि.नं.२२१/२०२४) गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोवैद्यानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस अॅक्ट) कलम ८ (क), २१ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोउपनिरीक्षक अशोक गुजाळ हे करीत आहेत.
ही कारवाई पौर्णिमा चौगुले, पोलीस उप आयुक्त, पदमजा बडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर टिळेकर, पोलीस निरीक्षक (प्रशासन) मंगेश अंधारे गुन्हे प्रकटिकरण शाखेचे, सपोनि/गणेश केकान, सपोनि/रोशन देवरे, पो.अंम. सचिन मोहीते, सचिन खताळ, जययंत खंडयी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com