नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांच्यासोबत शहरात घडलेल्या घटनेसंदर्भात घेतला आढावा..

सह संपादक – रणजित मस्के
नागपूर ;


यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. शांतता भंग करणाऱ्या दंगेखोरांविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
शांतताप्रिय शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. या शहराला अशांत करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. औरंगजेबासंदर्भात दुपारी आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केल्यानंतरही समाजकटंकांनी सायंकाळी दंगा भडकवला.
दंगलखोरांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ कारवाई करुन दंगल आटोक्यात आणली. परंतु, यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची जाळपोळ व संपत्तीचे नुकसान झाले आहे. पोलिसांवरही दगडफेक केल्यामुळे ३४ पोलीस जखमी झाले आहेत.
अशा प्रकारच्या घटना शहराच्या कुठल्याही भागात घडणार नाहीत, यादृष्टीने #पोलीस विभागाने सतर्क राहून कठोर कारवाई करावी.
शहराच्या ११ पोलीस स्टेशनच्या परिसरात #जमावबंदी आदेश लागू केले आहेत. या प्रकरणी १३ गुन्हे दाखल झाले असून १०४ आरोपींना अटक केली आहे १२ विधी संघर्षित बालक आहेत.
सीसीटीव्ही कॅमेरे, जनतेकडून प्राप्त व्हिडीओ क्लीपच्या आधारे दंगलखोरांना शोधून कडक कारवाईचा सूचना दिल्या आहेत.