नागपूर शहराचे पोलीस आयुक्त Dr Ravinder Singal IPS यांनी सुरु केलेल्या “ऑपरेशन थंडर” या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ आणि तंबाखूजन्य वस्तूंविरोधात (COTPA अंतर्गत) नागपूर शहरात मोठ्या प्रमाणावर कारवाई

सह संपादक -रणजित मस्के
नागपूर




पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर शहरात एकाच वेळी सर्व 16 ठिकाणी धाड टाकण्यात आली.यामध्ये ई-सिगारेट तसेच हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर व इतर साहित्य जप्त करण्यात आले. एकूण 16 ठिकाणांहून मिळून मोबाईल फोन, मोपेड वाहन, हुक्का साहित्य अशा मिळून 43 लाख 37 हजार 448 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींविरुद्ध इलेक्ट्रिक ई-सिगारेट प्रतिबंधक अधिनियम 2019, कोटपा कायदा, प्रतिबंधित सुगंधी तंबाखू कायदा आणि बीएनएस अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
“ऑपरेशन थंडर” अंतर्गत राबवण्यात आलेल्या “मिशन AXE ” मध्ये कडक कारवाई करण्यात आली, तर दुसरीकडे जनजागृतीलाही प्राधान्य देण्यात आले.