मायभूमी फाउंडेशन तर्फे नालासोपारात रक्तदान शिबिराचे भव्य दिव्य आयोजन संपन्न..

0
Spread the love

मुख्य संपादिका – दिप्ती भोगल

नालासोपारा :-दिनांक 22 जून 2025 रोजी साई छाया हायस्कूल, मोरेगाव,नालासोपारा येथे मायभूमी फाऊंडेशन मार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते सध्या रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे अल्पावधीत रक्तदात्यांना आव्हान करून एकूण 140 रक्तदाते रक्तदानासाठी उपस्थित राहिले त्यापैकी 109 रक्तदात्यानी यशस्वी रक्तदान केले .

रक्तदान शिबिर साठी अनेक मान्यवर उपस्थित होते डॉक्टर संजय जाधव, श्री अनंत फीलसे (उद्योजक) , श्री चेतन मोरे (सह संपर्क प्रमुख, माणगाव) श्री चंद्रकांत सावंत साहेब (माणगाव बाविसी विभाग मा. अध्यक्ष), श्री मारुती पलणकर (कुणबी समाज सेवा संघ मंडणगड), श्री विश्वनाथ रक्ते (अध्यक्ष कुणबी समाजोन्नती संघ शाखा मंडणगड) परशुराम पिचुरले साहेब (खजिनदार कुणबी समाजोन्नती संघ, मंडणगड), श्री संजय मनवे साहेब (कुणबी सेवा संघ उपाध्यक्ष मंडणगड),श्री दीपक सोंडकर साहेब ( रुग्णसेवक व्ही एन देसाई रुग्णालय), श्री दीपक मांडवकर साहेब पत्रकार, श्री सुनिल मांडवकर साहेब (लेखक दिग्दर्शक) श्री जयराम पवार साहेब (अचानक प्रवासी भजन मंडळ), श्री हेमंत रामाने साहेब समाजसेवक,श्री शशिकांत भानसे साहेब, समाजसेवक, श्री मंगेश हुमणे समाजसेवक, श्री दिपक पवार श्री महेश गोठल उद्योजक, श्री दशरथ गोठल,तसेच मायभूमी फाऊंडेशन संस्थापक श्री अनंत धोंडू काप, श्री सत्यजीत भोनकर (सहसचिव), कृष्णा चाचले (खजिनदार) , श्री मनोज डाफळे (समाजसेवक) रुग्णसेवक : श्री संतोष नागले साहेब (कस्तुरबा हॉस्पिटल), श्री संदेश मेढेकर, (के ई एम हॉस्पीटल)श्री परेश बटावले , (नायर हॉस्पिटल)श्री राजेश खिडबिडे, ( भक्ती वेदांत, हॉस्पिटल वसई), श्री सतीश सोंडकर (भक्ती वेदांत हॉस्पिटल, मीरा रोड) ,श्री देवेंद्र गोठल, श्री मोहन म्हस्के, रत्नेश बाईत , रितेश बाईत , श्री अशोक आंबेकर,श्री सुरेश काप श्री रवी म्हाबद्दी, श्री महेश पाडेकर,रोशन हरावडे , अनिकेत काप, मनीष हुमणे, श्री नथुराम पवार, मारुती चाचले, संजय पवार श्री दत्ताराम बाईत , श्री दिनेश काप, श्री दीपक रेवाळे ,अशा अनेक मायभूमी फाऊंडेशनचे शिलेदार रुग्णसेवक व पदाधिकारी यांनी सहकार्य केले.

यावेळी अध्यक्ष श्री अनंत काप यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व सर्व रक्तदात्यांना मनापासून धन्यवाद दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट