चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्याला अटकस्थानिक गुन्हे शाखा शिरुर पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे :– चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करणाऱ्याला अटक करण्यात आली. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर पोलिसांनी केली. स्वप्निल शामराव रणपिसे (वय २६ वर्षे, रा. रांजणगाव सांडस, ता. शिरूर, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
त्याचे लग्न जमण्यापुर्वी मुलींना त्यांचे गतआयुष्याबाबत विचारणा करत असे या कारणावरून बऱ्याच मुलींनी लग्न करण्यास नकार दिलेला होता. आरोपी स्वप्निल रणपिसे याचा स्वभाव संशयी व चारीत्र्यावर संशय घेणारा असल्याने त्याने पत्नीचा देखील चारीत्र्याचा संशय घेतला व तिचा खून केला आहे.
शितल स्वप्निल रणपिसे (वय २३ वर्षे, रा. रांजणगाव सांडस, ता. शिरूर, जि. पुणे) ही ३ जुलै २०२४ दुपारी ०१/३० च्या सुमारास घरात एकटीच होती. तिचा पती स्वप्निल शामराव रणपिसे, सासरे शामराव रणपिसे, हे कामानिमित्ताने बाहेर गेले होते. तसेच सासु शारदा रणपिसे या त्यांचे साडयांचे दुकानात जावून बसलेल्या होत्या. दु १४/०० वा पती स्वप्निल रणपिसे हा घरी आला तेव्हा घराचा दरवाजास बाहेरून कडी लावणेत आलेली होती. शितल रणपिसे आजुबाजूला कोणाचे घरी नसल्याचे तसेच तिचा फोन रिसीव्ह होत नसल्याने स्वप्निल रणपिसे याने त्याची आई शारदा रणपिसे यांना बोलावून घेवून चुलत भाउ रणजित रणपिसे याचेसोबत घराचे पाठीमागील दरवाजाची बाहेरील कडी काढून घरात गेले असता, शितल स्वप्निल रणपिसे हीचे गळयाला निळया रंगाची दोरीने आवळलेले होते, तसेच हाताचे अंगठयाला इलेक्ट्रीक वायरने करंट दिलेला होता व ती निपचित पडलेली होती. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते.
तिला उपचारकामी केडगाव येथील निरामय हॉस्पीटल येथे नेले असता, ती मयत झालेली असल्याचे सांगितले. झालेल्या प्रकाराबाबत स्वप्निल शामराव रणपिसे याने अज्ञात व्यक्ती विरोधात खूनाची फिर्याद नोंदविली आहे.
त्यानुसार शिरूर पोलिसांनी (गु.र.नं. ६८२/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१) प्रमाणे) गुन्हा दाखल केला.
शितल रणपिसे हिचे सात महिन्यांपुर्वीच लग्न झालेले होते. सदरचा प्रकार गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण यांनी भेट देवून तपासाचे अनुषंगाने सुचना व मार्गदर्शन केले. गुन्हयाचा प्रकार गंभीर होता त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक रमशे चोपडे, पुणे विभाग, एस.डी.पी.ओ. प्रशांत ढोले, शिरूर विभाग, यांच्याअखत्यारीत स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस स्टेशनकडील पथकांनी सखोल तपास सूरू केला. मयत महिलेचे काही महिन्यांपूर्वी लग्न झालेले होते, त्या अनुषंगाने प्रथम कौटुंबिक वादविवादाचे अनुषंगाने तपास सुरू करणेत आला, तसेच घरामध्ये सामान अस्ताव्यस्त पडलेले असल्याने सरदचा प्रकार चोरीचा आहे का या मुद्दयावर देखील तपास सुरू केला असता, सदरचा प्रकार हा बनाव असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर सर्वोतोपरी शंका तपासण्यात आल्या, सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, दरम्यान मयताचा पती स्वप्निल रणपिसे हा उच्चशिक्षीत असल्याने तो वारंवार वेगवेगळी हकिकत सांगत होता, त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे तपास केला असता, त्याने त्याची पत्नी शितल रणपिसे हिचा चारीत्र्याचे संशयावरून खून केला असल्याचे सांगितले.
आरोपी स्वप्निल शामराव रणपिसे याचे व पत्नी शितल रणपिसे यांचेत वादविवाद होत होता, तो तिचे चारीत्र्यावर नेहमी संशय घेत होता व तिचे गत आयुष्याबाबत तिला वारंवार विचारणा करत होता. त्यातून त्यांचेत नेहमी वाद होत होते, तिचेवरील चारीत्र्याचे संशयामुळे आरोपी स्वप्निल शामराव रणपिसे वय २६ वर्षे, रा. रांजणगाव सांडस, ता. शिरूर जि पुणे याने तिचा खून केला असल्याची माहिती प्रथमदर्शनी आरोपी स्वप्निल रणपिसे याचे या लग्न जमण्यापुर्वी मुलींना त्यांचे गतआयुष्याबाबत विचारणा करत असे या कारणावरून बऱ्याच मुलींनी लग्न करण्यास नकार दिलेला आहे.
आरोपी स्वप्निल रणपिसे याचा स्वभाव संशयी व चारीत्र्यावर संशय घेणारा असल्याने त्याने पत्नीचा देखील चारीत्र्याचा संशय घेतला व तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. एस.डी.पी.ओ. श्री. प्रशांत ढोले, शिरूर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशन चे पो नि ज्योतीराम गुंजवटे, स्था.गु.शा.चे सपोनि राहूल गावडे, शिरूर पो स्टेचे सपोनि अमोल पन्हाळकर, पोसई एकनाथ पाटील, स्था.गु.शा.चे अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, तुषार पंदारे, योगेश नागरगोजे, राजू मोमीन, अतुल डेरे, जनार्दन शेळके, मंगेश थिगळे, संजू जाधव, सागर धुमाळ, काशिनाथ राजापूरे, अक्षय सुपे, शिरूर पो स्टेच अंमलदार गोपीनाथ चव्हाण, नितीन सुद्रीक, परशुराम सांगळे, प्रफुल्ल भगत, राहुल भवर, नाथा जगताप, नितेश थोरात, सचिन भोई, विनोद काळे, शिवाजी भोते यांनी केली असून पुढील तपास शिरूर पो स्टेचे हे करत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com