मुंब्रा-दिवा सेन्ट्रल लाईन वर पुन्हा एकदा मोठा मेगा ब्लॉक…?

0
Spread the love

प्रतिनिधी :- सायली मळेकर

ठाणे – रविवार दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी मध्य रेल्वे, मुंबई विभाग वर (रविवार आणि सोमवार) ठाणे-दिवा विभागातील 5व्या आणि 6व्या लाईनच्या संचालनाशी संबंधित महत्वपूर्ण अभियांत्रिकी काम केले जाईल. त्यामुळेच 24 तासांसाठी रेल्वे धीम्या गतीने धावनार आहे.

हा ब्लॉक कालावधी रविवार दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी पहाटे 02 : 00 वाजल्या पासून सोमवार दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी पहाटे 02 : 00 पर्यंत आहे.

यादरम्यान ठाणे कल्याण अप आणि डाऊन लोकल मार्गावरील उपनगरीय सेवा बंद राहतील. सदर कालावधित कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर उपनगरीय लोकल गाड्या थांबणार नाहीत. तरी प्रवाशांनी कृपया सहकार्य करावे ही नम्र विनंती.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट