मुंबईमध्ये हिंदुह्रदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे ड्रिम पार्कचा लोकार्पण सोहळा मा.श्री.आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते…

0
Spread the love

कांदिवली (पुर्व): ठाकूर व्हिलेज येथे मंगळवार दि. ७ डिसेंबर २०२१ रोजी कार्यसम्राट आमदार मा. श्री.प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्तव्यदक्ष नगरसेविका सौ .माधुरीताई योगेश भोईर यांच्या मनपा निधीतून 8 एकर जमिनीवर पसरलेल्या *हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे ड्रीम पार्क उद्याटनाचा व सेल्फी पॉईंट चा लोकार्पण सोहळा शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख,पर्यावरणमंत्री, पालकमंत्री मा.श्री.आदित्यसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते पार पडला.

मा.आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते लोकार्पण

या पार्कमध्ये जॉगिंग ट्रॅक, वोकिंग ट्रॅक, ट्वीन टॉवर, परगोला, सेल्फी पॉईंट, म्युझिकल कारंजे, लहान मुलांना अम्युसमेंट पार्क, ओव्हर ब्रिज, मियावाकी जंगल, खुले रंगमंच, स्केटिंग ट्रॅक आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

श्रीमान बाळासाहेब ठाकरे ड्रिम पार्क
ड्रीम पार्क म्युझिकल कारंजे

या शुभारंभसमयी उपमहापौर मा. श्री. सुहास वाडकर, शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती मा. श्री. विनोद घोसाळकर, विभागप्रमुख / आमदार मा. श्री. विलास पोतनीस, युवासेना कार्यकारिणी सदस्य मा. श्री. सिद्धेश कदम, म. विभाग संघटक सौ. सुजाता शिंगाडे, सर्व नगरसेवक, श्री राज सुर्वे, इत्यादीं शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट