मुंबईच्या स्वराज्य भूमी, गिरगांव येथे लोकमान्य टिळक यांची १०५ वी पुण्यतिथी साजरी..

प्रतिनिधी – महेश वैद्य
मुंबई

या कार्यक्रमासाठी आपल्या संघटनेचे अध्यक्ष आणि लोकमान्यांचे पणतू श्री शैलेश टिळक यांना स्वराज्य भूमी समितीचे श्री प्रकाश सलाम यांनी समितीतर्फे आमंत्रित केले होते.
यावेळी श्री हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांसह प्रसिद्ध विधिज्ञ उदय वारुंजीकर, मुंबई मनपाचे उपायुक्त आशा नामवंतांनी हजेरी लावली होती.
त्यावेळचे हे छायाचित्र.
(मला आज लागलेला शोध- आपण, म्हणण्यापेक्षा मी, नेहमी लोकमान्यांचे हे जगप्रसिद्ध वाक्य लक्षात ठेवून होतो ते म्हणजे
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच”
हे असे होते.
पण,
लोकमान्यांच्या शिल्पावर त्यांचे खरे वाक्य असे कोरलेले
आहे की,
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच.”
यात मी
‘हक्क मिळवणारच’
हे अभिप्रेत नसुन
ते स्वराज्य
मी मिळवणारच
असा असल्याचे शैलेश टिळकांनी सांगितले.
जय हिंद!